पुण्यातले हे ४ हॉटेल्स आहेत अस्वच्छतेचे माहेर घर !!

पुणेकरांनो एक महत्वाची सूचना, तुम्ही जर ‘रुपाली’, ‘वैशाली’, ‘कॅफे गुडलक’, ‘याना सिझलर्स’ हॉटेल्सना ‘जगात भारी’ समजत असाल तर तो तुमचा गैरसमज आहे. आता पुणेकरांना चुकीचं ठरवण्याचं काम आम्ही थोडीच करणार आहे. ते काम ‘एफडीए’ म्हणजे 'फूड्स अॅण्ड ड्रग्स' विभागाने केलंय. आज अचानक पडलेल्या धाडीत असं आढळून आलं की हे चारही हॉटेल्स अस्वच्छतेचे ‘माहेर घर’ आहेत.
नक्की काय घडलंय ?

स्रोत

त्याचं झालं असं, रुपाली, वैशाली, कॅफे गुडलक, याना सिझलर्स या प्रसिद्ध हॉटेल्सवर आज अचानक ‘एफडीए’ची धाड पडली. एफडीए’ विभागाच्या पाहणीत या हॉटेल्सच्या किचनचा भाग अत्यंत अस्वच्छ आणि आरोग्यास धोकादायक आढळून आला. ‘एफडीए’ ने घालून दिलेल्या स्वच्छतेच्या निकषांना या हॉटेल्सनी धाब्यावर बसवलंय राव.

स्रोत

आता फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं आवडतं हॉटेल वैशालीचं घ्या ना. अस्वच्छ भांडी, अस्वच्छ फ्रीजर, अस्वच्छ ‘शेफ’, कचऱ्याने भरलेलं किचन, हे कमीच होतं म्हणून कित्येक दिवसांत किचनमध्ये पेस्ट कंट्रोलही केलेलं नाही. गुडलक मध्ये याहून वेगळं चित्र नव्हतं. भिंतीवर कोळ्यांची जाळी पसरलेली, उघड्यावर ठेवलेले पदार्थ, असा सगळा अस्वच्छ कारभार होता. कॅफे गुडलक मध्ये तर स्वयंपाक्यांना कपडे बदलण्यासाठी वेगळी रूमही नाही.

मंडळी, पुण्याची ओळख असलेले हे हॉटेल्स असे रंगे हात पकडले गेल्यामुळे त्यांच्यावर काय कार्यवाही होते हे आता बघण्यासारखं असेल.

सबस्क्राईब करा

* indicates required