computer

आयपीएल यशस्वी का आहे? ही आहेत महत्त्वाची ४ कारणे !!

आजच्या घडीला जगात सर्वात जास्त लोकप्रिय कुठली स्पर्धा असेल तर ती आयपीएल आहे. क्रिकेटला अस्सल व्यवसायिक रूप प्राप्त करून देणारी स्पर्धा म्हणून आयपीएल पुढे आली. आयपीएलकडे बघून अनेक स्पर्धा सुरू झाल्या. त्यातल्या काही टिकल्या तर काही आवरल्या गेल्या. पण आयपीएल गेली 13 वर्षे आपली लोकप्रियता टिकवण्यात सातत्याने यशस्वी ठरली आहे. काय आहेत यामागील कारणे? आज जाणून घेऊया.

१. आयपीएलचे वेळापत्रक.

गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे पडलेला खंड सोडला तर आयपीएल सहसा एप्रिल-मे या दोन महिन्यात घेण्यात येते. या काळात जगभरात क्रिकेटच्या मोठ्या सिरीज आयोजित केल्या जात नाहीत. यामुळे जगभरातील खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होणे सोपे जाते. ही गोष्ट इतर स्पर्धांना लागू पडत नाही. बऱ्याचवेळा आयपीएल संपल्यावर महत्वाच्या सिरीज सुरू होतात. सर्व खेळाडू त्यात सहभागी होऊ शकतात. 

२. जगभरातील क्रिकेटपटूंचा भरणा.

जगातील सर्वोत्तम ओपनर विराट कोहली आणि एबीडी डिव्हीलीयर्स एकाच संघाकडून ओपनिंग करताना पाहणे फक्त आयपीएलमध्येच घडू शकते. हे पाहणे डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. जगातील एक से बढकर एक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असल्यामुळे आयपीएलला एक वेगळी रंगत मिळते. 

३. भारतात क्रिकेटला दिले जाणारे महत्त्व.

भारतात आयपीएल होत असल्याने मैदाने खच्चून भरलेली असतात. तसेच मैदानाबाहेर देखील आयपीएलचे संपूर्ण दोन महिने आयपीएलमय वातावरण असते. बाहेरच्या देशात भारताच्या मानाने क्रिकेटला दिले जाणारे महत्त्व कमी आहे. भारतात चाहत्यांचे प्रेम बघून जगभरातल्या खेळाडूंना हुरूप येतो.

४. आयपीएलचे व्यावसायिक स्वरूप.

आयपीएलच्या यशामागे सर्वात मोठा कोणता फॅक्टर असेल, तर तो म्हणजे पैसा आहे. आयपीएल ही खेळाडू, संघाचे मालक, BCCI तसेच इतरही घटकांना मालामाल करणारी स्पर्धा आहे. आयपीएलचे रेव्हेन्यू मॉडेल हेच एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. वर्षभरात आपापल्या राष्ट्रीय संघाकडून खेळून जेवढी कमाई होत नाही तेवढे या दोन महिन्यात खेळाडू कमवत असतात. म्हणून साहजिकच ते आयपीएलला प्राधान्य देतात.

 

तर, आम्हाला समजलेली ही ४ कारणे आहेत. तुम्हाला आणखी कोणती कारणे वाटतात? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required