computer

भारताच्या वाढत्या लोकसंख्येची ५ अविश्वसनीय तथ्ये !!

नमस्कार लोक्स, आज आपण बोलूया भारताच्या लोकसंख्ये बद्दल. भारत हा लोकसंख्येचा देश आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. स्वतंत्र मिळाल्या पासून ते आजतागायत आपल्या देशाची लोकसंख्या चढत्या क्रमात आहे. मुंबईचे किंवा भारतातल्या इतर शहरांचे जुने फोटो बघताना तुम्हाला जाणवेल की त्यावेळी आजच्यासारखी गर्दी नव्हतीच. लोकसंख्यावाढीची करणं काहीही असली तरी आपल्या देशाच्या आर्थिक जडणघडणीला नक्कीच  अडथळा आणणारी आहे.

जागतिक लोकसंख्या संभावना (World Population Prospects) सर्वेक्षणानुसार भारताच्या लोकसंख्ये बाबत काही महत्वाचे खुलासे करण्यात आले आहेत. या सर्वेक्षणातून आलेल्या माहितीतून काही खळबळजनक तथ्य बाहेर पडली आहेत.

चला तर पाहुयात भारतीय लोकसंख्ये बाबत हे सर्वेक्षण काय म्हणतं ते....

आम्ही हा लेख लिहिला तेव्हा भारताची लोकसंख्या एवढी होती 

१. पुढच्या ७ वर्षात भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश

राव, चीन (१३७.८७ कोटी) हा लोकसंख्येच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सर्वेक्षणानुसार भारताच्या सध्याच्या लोकसंख्यावाढीचा दर बघता पुढच्या ७ वर्षात भारत हा चीनलाही मागे टाकून लोकसंख्येच्या बाबतीत पहिला क्रमांक पटकावेल.

२. आपला देश तरुणांचा देश राहणार नाही ?

आपला देश हा तरुणांचा देश आहे असं म्हटलं जातं. पण सर्वेक्षणानुसार २०५० पर्यंत आपल्या देशात प्रत्येकी ५ माणसांमध्ये १ माणूस हा ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल. पुढील ७ वर्षांमध्ये आपल्या देशाचा बहुसंख्येने असलेला वर्ग हा ४० च्या घरात असेल. म्हणजे भारत तरुणांचा देश राहणार नाही.

३. तरुण मातांची संख्या

आई होण्याचं वय घटत चालल्याची महत्वाची माहिती या सर्वेक्षणातून हाती आलेली आहे. मुलींची कमी वयातील लग्न आणि त्यांना कमी वयातच झालेली गर्भधारणा हे या मागचं कारण आहे. या अर्थी पुढील काळात भारतात सर्वात जास्त तरुण माता असतील.

४. मुलींची संख्या वाढेल

ही बातमी मात्र समाधानकारक आहे. आज भारतात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा कमी असली तरी २०२० पर्यंत हा फरक राहणार नाही. लिंग गुणोत्तरातला फरक कमी होण्याची शक्यता आहे. ज्या मुलींचा मृत्यू ५ वर्षाच्या आत झाला अश्या मुलींच्या संख्येत आता घट होत आहे.

५. २०४० पर्यंत अवलंबून असलेल्या संख्येत वाढ होईल

आज आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे. साधारणपणे २७ वर्ष वय असलेला तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तरुण आपल्या आई वडिलांवर किंवा इतरांवर आर्थिक कारणांसाठी अवलंबून नाहीत पण २०४० पर्यंत हे चित्र बदललेलं असेल. जे लोक इतरांवर आर्थिक आणि इतर कारणांसाठी अवलंबून  असतील अशा लोकांची संख्या वाढणार आहे. याचा परिणाम प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे भारताच्या तिजोरीवर होऊ शकतो.  

 

हा लेख लिहून झाल्यावर भारताची लोकसंख्या इतकी झाली होती. लोकसंख्या वाढ किती जलद होत आहे हे यावरून स्पष्ट होतं.

सबस्क्राईब करा

* indicates required