computer

काय म्हणता, चक्क दोन आणि चार मिनिटांचे विमान प्रवास? कोण आणि कुठे करतं असले प्रवास?

विमान प्रवास म्हणजे कमीतकमी दीड तासांचा प्रवास ठरलेलाच. मुंबई ते पुणे प्रवासालाही कमीतकमी ४५ मिनिटांचा अवधी लागतोच. पण तुम्हाला माहित आहे का जगात असेही काही विमान प्रवास आहेत जे अगदी २ मिनिटात सुद्धा पार पडतात.

आता तुम्ही म्हणाल की त्यापेक्षा गाडी करा ना सरळ सरळ. या छोट्या फ्लाईट्सचा जन्म का झाला याचं उत्तर त्या भागातले नकाशे बघितल्यावर मिळेल राव.

चला तर आज पाहूयात जगातले ५ सर्वात लहान विमान प्रवास.

५. १५ मिनिटे

जपानच्या ‘मिनामीडेटो’ आणि ‘किटाडीडेटो’ या दोन बेटांमधला विमानप्रवास अवघ्या १५ मिनिटात पूर्ण होतो.

४. १० मिनिट

‘केमॅन’ द्वीपसमूहात असलेल्या ‘लिटील केमॅन’ बेटावरून ‘केमॅन ब्रॅक’ बेटावर जायला अवघ्या १० मिनिटाचा कालावधी लागतो.

३. ८ मिनिटे

वरील दोन्ही ठिकाणे ही एकाच देशामधली होती. पण जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान विमान प्रवास हा दोन वेगवेगळ्या देशांमधला आहे. स्वित्झर्लंडच्या सेंट गॅलन बेटावरून जर्मनीच्या ‘फ्रीडरिक्सहाफेन’ बेटावर जाण्यासाठी फक्त ८ मिनिटे लागतात.

२. ६ मिनिटे

‘इन्शिमान’ आणि ‘कॅनेमारा’ या आयर्लंड मधली दोन ठिकाणांना जोडणारा विमान प्रवास हा केवळ ६ मिनिटांचा आहे.

१. २ मिनिटे

पहिला क्रमांक लागतो स्कॉटलंडच्या ‘वेस्ट्रे’ आणि ‘पापा वेस्ट्रे’ बेटांचा. या बेटांमधला प्रवास फक्त २ मिनिटात पार पडतो. म्हणजे वेस्ट्रे मधला माणूस पापा वेस्ट्रे मधल्या माणसाला २ मिनिटात येतो म्हणाला तर तो खरोखरच २ मिनिटात पोहोचेल राव.  

सबस्क्राईब करा

* indicates required