computer

झोपेचा बळी न देता सकाळी लवकर उठा....या ६ टिप्स बघून घ्या !!

फारच कमी लोक आहेत ज्यांना सकाळी लवकर उठायला आवडतं. नाही तर अनेकांना सकाळी लवकर उठण्याच्या नावानेच धडकी भरते. मनाविरुद्ध का होईना पण शाळा, कॉलेज, किंवा नोकरीच्या निमित्ताने लवकर उठावंच लागतं. अशा लोकांना काही दिवसांनी लवकर उठण्याची सवय होऊन जाते, पण काहींना प्रचंड वैताग येतो. या दुसऱ्या प्रकारातल्या लोकांसाठी आम्ही आज काही टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्सच्या आधारे तुम्ही सकाळी सहज लवकर उठू शकता आणि तुमच्या झोपेचं खोबरं देखील होणार नाही.

1. रोज दहा ते पंधरा मिनिटे लवकर उठण्यास सुरुवात करावी. कारण जर अचानकपणे तुम्ही लवकर उठलात तर तुमचा दिवस प्रचंड आळसात जाईल.

2. आपल्याकडे एक म्हण आहे " लवकर निजे,  लवकर उठे त्यास आरोग्य लाभे ".  याच म्हणीनुसार जर तुम्हाला लवकर उठायचे असेल, तर लवकर झोपी जाणे अनिवार्य आहे. तुम्ही तुमच्या दिवसभरातील दिनचर्येचा अभ्यास करून झोपी जाण्याची एक वेळ ठरवून घ्या.  तुमच्या शरीराला मग या दिनचर्येची सवय होऊन जाईल.  जर सुरवातीला तुम्हाला लवकर झोप येत नसेल तर तुमच्या ठरलेल्या वेळेला विश्रांत अवस्थेमध्ये पुस्तक वाचत बसावे त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल. ठरलेल्या वेळेनंतर मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर शक्यतो टाळावा.

3. झोपी जाण्यापूर्वी पुढच्या दिवसाचे वेळापत्रक ठरवून घ्यावे. जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ठरवलेली कामे पूर्ण करण्यात वेळ घालवाल. 

4.  उठण्यासाठी गजर लावाच.  पण तुमचा मोबाईल किंवा गजराचे घड्याळ गजर लावल्यानंतर थोडा दूर ठेवा.  म्हणजे गजर वाजल्यानंतर तुम्हाला झोपेतून उठून तो बंद करायला लागेल. या कृतीमुळे तुमची झोप नक्कीच कमी होईल.

5. पहाटे लवकर उठल्यानंतर एक काळजी मात्र घेतली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही सकाळी न्याहारी घ्यावी. कारण तुमच्यासाठी दिवस मोठा असणार आहे.

6. जेव्हा तुम्ही पहाटे लवकर उठण्याचा निश्चय कराल त्या दिवसापासून कसोशीने तो तुमचा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर तुम्ही हे नक्कीच करू शकता.

सबस्क्राईब करा

* indicates required