computer

अवघ्या ७ व्या वर्षी मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजी असोसिएटची परीक्षा पास करणारा हा लहानग्या आहे तरी कोण?

वयाचा आणि हुशारीचा फारसा संबंध नसतो हे या लहान मुलाने सिद्ध केले आहे. ओडिशा येथील बालनगीरला राहणारा ७ वर्षांचा वेंकट रमण पटनायक याने मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजी असोसिएट नावाची परीक्षा पास केली आहे. जागतिक स्तरावरील असलेली ही परीक्षा अनेक वर्ष टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतलेल्यांना देखील पास करता येत नाही, ते त्याने वयाच्या ७व्या वर्षीच करून दाखवले आहे.

ही अशी परीक्षा असते जी पास करता करता अनेकांच्या डोक्याचे केस गळतात, पण या लहानग्याने एखाद्या स्कॉलरशिपची परिक्षा पास करावी या थाटात ही परीक्षा पास करून दाखवली आहे. वेंकट तिसरीत शिकतो. त्याने जावस्क्रीप्ट, पायथॉन, एचटीएमएल, सिएसएस आणि डाटाबेस एडमिनीस्ट्रेशन यांच्यासाठी गरजेची असलेली एमटीए परीक्षा पास करून दाखवली आहे.

व्यंकट हा व्हाइट हॅट ज्युनियरचा विद्यार्थी आहे. गेल्या एका वर्षात त्याने व्हाइट हॅटचे १६० क्लासेस अटेंड केले आहेत. त्याचे शिक्षक जतींदर कौर सांगतात की, 'व्यंकट पहिल्या दिवसापासून कोडिंगवर पकड मिळवून होता. त्याच्या सारखे विद्यार्थी दुर्मिळ असतात.'

व्यंकट सारखाच अगस्त्य जैस्वाल हाही एक असाच हुशार विद्यार्थी आहे. त्याने वयाच्या १४ व्या वर्षी उस्मानिया विद्यापीठाची पत्रकारितेतील पदवी मिळवून दाखवली. हा पराक्रम करून दाखवणारा हा पठ्ठ्या पहिला भारतीय ठरला आहे.

हैद्राबादचा असलेला अगस्त्य अवघ्या ९ वर्षाच्या वयात १० वी तर ११ व्या वर्षी १२ वी पास करणारा विद्यार्थी ठरला होता. व्यंकट, अगस्त्य सारखे विद्यार्थी हे खरोखर विलक्षण प्रतिभा घेऊन जन्माला येत असतात. भविष्यात डिजिटल इंडिया क्रांतीत हे अवलीये आपला स्वतःचा वेगळा ठसा उमटवताना दिसले तर आश्चर्य वाटणार नाही.

 

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required