अबब... जयललितांच्या मृत्यूच्या धक्क्याने ७७ जणांचा मृत्यू!!

सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं जयललितांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांवर जणू आभाळच कोसळलं. तामिळनाडूचा चेहरा हरपला. मृत्युनंतर लोकांनी केलेला आक्रोश तर मन हेलावून टाकणारा होता. 

            पण आणखी एक धक्कादायक बातमी म्हणजे जयललितांच्या मृत्यूचा धक्का बसून चक्क ७७ जणांचा मृत्यू झालाय!  हे वृत्त खुद्द जयललितांच्या AIDMK पक्षाने दिलंय. लोकांना आपल्या लाडक्या अम्मांच्या मृत्यूची बातमी सहन न होण्यापलीकडची होती. पक्षातर्फे या मृत व्यक्तींच्या कुटूंबांना प्रत्येकी ५० हजार रुपये रूपये मदतही जाहीर करण्यात आलीय. इतकंच नव्हे तर अनेक जणांनी दुःखाच्या आवेशात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय,  तर कोणी आपली बोटं कापून घेतली आहेत. 

साऊथ इंडियन लोकांचं सिनेकलाकारांवरचं प्रेम जगजाहिर आहे. जगातला हा कदाचित एकमेव भाग असावा जिथं लोकप्रिय सिनेकलाकारांचीही मंदिरं बांधली जातात.  अर्थातच तितकंच ते राजकारण्यांवरही प्रेम करतात.  जयललिता तर आधी अभिनेत्री आणि नंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री. 

या सार्‍या प्रकारावरून आपण जयललितांची लोकप्रियतेचा अंदाज बांधू शकतो.

सबस्क्राईब करा

* indicates required