रोज योग करणाऱ्या आजीबाई ! यांचं वय वाचून तुम्हाला धक्का बसेल !!
२१ जूनला योग दिवस होऊन गेला. काहींनी त्या दिवशी भल्या पहाटे उठून योगाला सुरुवात केली पण योग जर रोज करायचं झालं तर ? वेळ नाही, रोज उठून कोण करणार, आमच्या घरात तेवढी शांतता नसते इ. अशी कारणे येणं स्वाभाविक आहे पण आम्ही आज तुम्हाला अश्या एका व्यक्तीची ओळख करून देणार आहोत जी रोज नित्यनियमाने योग करते आणि इतरांना शिकवते सुद्धा.
भेटा कोइमतुर मधल्या ९७ वर्षांच्या 'ननम्मल' यांना. या आजीबाई रोज योग तर करतातच पण आहाराच्या बाबतीतसुद्धा त्या काटेकोर आहेत. त्या जरी ९७ वर्षांच्या असल्या तरी त्यांच्याकडे बघून त्या ९७ वर्षांच्या आहेत यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. योगमुळेच ते आजही त्याच तडफेने काम करताना दिसतात. या वयातही त्या इतरांना योग शिकवून त्याचे महत्व पटवून देत आहेत. ननम्मल यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
ननम्मल योगचं महत्व सांगताना म्हणतात कि "तुम्ही जर रोज योग केलत तर तुम्हाला हॉस्पिटलवर खर्च करण्याची गरज पडणार नाही". आपल्या कृतीतून त्यांनी योगचं महत्व पावून दिलं आहे. अशा फिट अँड फाईन आजींना आमच्या तर्फे बोभाटा सलाम.




