व्हिसा मिळण्यासाठी इथे लोक अर्पण करतात विमान !!!

सातासमुद्रापार जाण्याचं स्वप्न तसं बर्‍याच जणांचं असतं.  पण विदेशात जाऊन फिरायची, तिथं स्थायिक होण्याची हौस पूर्ण होणं तसं खूपच अवघड काम राव! पासपोर्ट काढण्यासाठी ऐनवेळची पळापळ, आणि त्यानंतर व्हिसा मिळवण्यासाठी जे महत्प्रयास करावे लागतात ते वेगळेच.

पण फक्त एका खेळण्यातल्या विमानाच्या बदल्यात व्हिसा मिळायला लागला तर? हो, या एरोप्लेन गुरूद्वारात जर तुम्ही खेळण्यातलं विमान अर्पण केलं तर तुमचं व्हिसाचं काम झालंच म्हणून समजा. असं आम्ही नाही तर इथले असंख्य श्रद्धाळू लोक सांगतात. हा शहीद बाबा निहाल सिंह गुरूद्वारा जालंधरपासून १२ कि.मी वर छोट्याश्या तल्हन गावात आहे. इथे फक्त देशातूनच नाही, तर विदेशातूनही भाविक येऊन बाबांच्या चरणी खेळण्यातलं विमान चढवतात. जेणेकरून त्यांनाही व्हिसा मिळावा.

(स्त्रोत)

प्रत्येक रविवारी इथं जवळपास ८०-१०० विमानं जमा होतात. खास करून संक्रांतीनंतरच्या रविवारी इथे भरपूर गर्दी असते आणि तीही तरूण मंडळींची, ज्यांनी परदेश गमनाची स्वप्नं रंगवली आहेत. ही पध्दत कशी सुरू झाली हे खुद्द मंदिर प्रशासनालाही माहिती नाही. पण अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी इथं विमान अर्पण केल्यानंतर त्यांचं विदेशात जायचं स्वप्नं पूर्ण झालंय. जमा झालेली ही खेळण्यातली विमानं दर्शनासाठी येणार्‍या लहान मुलांना वाटून टाकली जातात.

सबस्क्राईब करा

* indicates required