महाराणा प्रताप यांच्याबद्दल या ९ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

राजपुतांचा सर्वश्रेष्ठ राजा म्हणून महाराणा प्रताप ओळखले जातात. अकबराला पाणी पाजणारा आणि ज्याच्या मृत्यूमुळे स्वतः अकबरही हळहळला त्या महाराणा प्रतापांची आज जयंती आहे मंडळी.

मोगली फौजांसमोर त्यांनी कधीही गुढघे टेकले नाहीत, आपल्या भूमीवर नितांत प्रेम करणारा हा राजा. पण आपल्याला त्यांच्याबद्दल खूप कमी  माहिती असते आणि म्हणूनच आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत महाराणा प्रताप यांच्याबद्दल माहित नसलेल्या काही रंजक गोष्टी...

 

१. अकबर आणि महाराणा प्रतापमधल्या संघर्षाची परिणिती म्हणजे हळदीघाटचं युद्ध. हे युद्ध होऊ नये आणि महाराणा प्रताप यांनी मोगलांना सामील व्हावे म्हणून अनेकदा त्यांना अकबराकडून आमिष दाखवण्यात आलं. अर्धा हिंदुस्तान देण्याचा प्रस्ताव आला पण महाराणा प्रताप शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर कायम राहिले.

Image result for akbar

स्रोत

 

२. ८० किलोचा भाला, १२ किलोचे कवच, २ तलवारी असं युद्धातल्या त्यांच्या पेहरावाचं एकूण वजन तब्बल २०८ किलो होतं. वाचून विश्वास बसणार नाही.  पण या वस्तू आजही मेवाड राजघराण्याच्या म्युझियममध्ये तुम्ही पाहू शकता.

Image result for maharana pratap swordस्रोत

 

३. महाराणा प्रताप यांनी बहलोल खान याच्यावर केलेल्या वाराने त्याचे आणि त्याच्या घोड्याचे दोन तुकडे झाल्याचं इतिहासकार सांगतात.

Related image

स्रोत

 

४. अकबराच्या नवरत्नांपैकी एक म्हणजे कृष्णाचे निस्सीम भक्त ‘रहिम दास’ यांना त्यांच्या जनानखान्यासोबत बरोबर अमर सिंह (प्रतापांचा मुलगा) यानं ताब्यात घेतलं.  जेव्हा महाराणा प्रतापांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी सर्व स्त्रियांना सन्मानपूर्वक सोडून दिलं. स्त्रियांना अशी वागणूक दिल्याबद्दल त्यांनी अमर सिंहला चांगलंच झापलं.

Image result for real maharana pratap marriage

स्रोत

 

५. महाराणा प्रताप यांनी राजकीय कारणास्तव ११ स्त्रियांशी लग्न केली. त्यांना एकूण १७ मुले आणि ५ मुली होत्या.

Image result for rajasthani marriagees paintingस्रोत

 

६. चेतक आणि महाराणा प्रताप यांच्यामधलं नातं काही अजबच होतं. चेतक हा घोडा इतका वेगात पाळायचा कि त्याला उडणारा घोडा म्हणून ओळखलं जायचं. युद्धात मुघल सैन्य मागावर असताना जखमी प्रतापसिहांना घेऊन चेतक पळत राहिला.

स्रोत

 

७. महाराणा प्रताप हे आपल्या समवेत दोन तलवारी बाळगत हे आपल्याला माहित असेलच. त्यांना ही कल्पना त्यांच्या मातोश्री जयवंताबाई यांनी दिली होती.

स्रोत

८. त्यांनी अशी शपथ घेतली होती कि जोवर चित्तोड परत मिळवणार नाही तोवर मी जमिनीवर झोपेन आणि अत्यंत साधं अन्न खाऊन दिवस काढेन. शेवटी त्याचं हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांच्या मृत्यू झाला.

स्रोत

९. त्यांची आठवण म्हणून आजही राजपूत जेवताना ताटाखाली झाडाचं पान ठेवतात आणि झोपताना उश्याखाली गवत ठेवून झोपतात.  त्याचबरोबर बुंदेलखंड भागात गवताचा वापर करून बनवलेली भाकरी प्रसिद्द आहे.

Image result for rotis made of grass.

स्रोत

अशा या महान राजाला बोभाटाचा मानाचा मुजरा !!!

सबस्क्राईब करा

* indicates required