computer

फॉर्च्युनरनंतर आता बीडमध्ये ओला स्कूटरची गाढवासोबत वरात!! काय प्रकरण आहे हे?

कार, मोटरसायकल किंवा स्कूटर घ्यायचे म्हटले तरी मध्यमवर्गीय माणूस हजारवेळा विचार करतो.लोकं मोठ्या हौशीने, खर्च करून, कर्ज काढून गाड्या घेतात..बर्‍याचवेळाअसेही होते की गाडीच्या जाहिरातीत जे दावे केले जातात ते फोल ठरतात. कंपनीजवळ तक्रार कर, किंवा सोशल मीडियावर याबद्दल लिही असेही काही उपाय असतात पण ते करूनही कंपनी दखल घेत नाही हे कळल्यावर माणूस वैतागतोच .काही वल्ली मात्र लय डोक्यावरचे असतात.पदरात आलेले नैराश्य व्यक्त करण्यासाठी लोकं मग गाडीची वरात गाढवासोबत काढतात.फोर्ड टोयोटा,एमजी  या सगळ्या गाड्यांची आतापर्यंत गाढव वरात निघालेली आहे. आता नंबर लागलाय ओला स्कूटरचा !  .

आता आपल्या बीडमध्येही असाच किस्सा झाला आहे. सचिन गीते यांनी ओलाची ई- स्कूटर घेतली. सध्या ई- वाहनांचा जमाना आहे म्हणून त्यांनी ही गाडी तर घेतली. पण ही गाडी काही व्यवस्थित वाटत नव्हती. गाडीच्या तक्रारी आल्या. मग त्यांनी पहिला प्रयत्न केला तो ओलाच्या कस्टमर सर्व्हिसशी संपर्क केला.

कस्टमर सर्व्हिसने काय भाऊंकडे लक्ष दिले नाही. पैसे देऊन घेतली मग साधी सर्व्हिस देत नाहीत. मग काय भाऊचा पारा चढला आणि या गाडीची त्यांनी थेट गाढवासोबत मिरवणूक काढली. वरून बॅनर लावले कंपनीवर विश्वास करू नका म्हणून. सचिन गीते यांनी आपली स्कूटर दुरुस्तही होत नाही आणि बदलूनही दिली जात नाही म्हणून ग्राहक मंचाकडे तक्रार केली आहे. एवढेच नव्हे, तर सरकारने याची चौकशी करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.

गीते यांनी गाडी बुक केल्यावर सहा महिने वाट पाहिली होती. मार्च महिन्यात गाडी त्यांना मिळाली आणि महिना होत नाही तोवर गाडीच्या अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. सचिन यांच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने मात्र राज्याचे नाहीतर देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. एक मात्र नक्की.. आधी फॉर्च्युनर सोबत, आता ओला स्कुटीसोबत मिरवणूक निघाल्यावर गाढव पण म्हणत असतील 'ऐसे सिच्युएशन मे मैं अपने आप कैसे आगे आ जाता हूं?'

ओला स्कूटर मोठ्या धुमधडाक्यात लॉन्च झाल्या. पण अल्पावधीतच गाड्या आपोआप जळाल्याच्या घटना, तसेच आता ही घटना यामुळे ओलाच्या बाजारातील डिमांडवर मोठा फरक पडेल का?

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required