computer

राज कुंद्रा प्रकरणात अजिंक्य रहाणे कुठून आला? नेटकरी अजिंक्य रहाणेला ट्रोल का करत आहेत?

सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा पोर्नोग्राफीक सिनेमे तयार केल्याच्या आरोपावरून अटकेत आहे. मुंबई पोलिस या पोर्नोग्राफीक सिनेमा प्रकरणाचा छडा लावत असताना त्याचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. दोन दिवसांपासून या विषयावर विविध माध्यमांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांची भन्नाट क्रियटीव्हिटी या विषयावर पण दिसत आहे. असा एखादा विषय फोकसमध्ये आला की लोक कितीही जुना संदर्भ शोधून काढू शकतात.  याचा प्रत्यय सध्या भारताच्या आघाडीचा खेळाडू अजिंक्य रहाणेला येत आहे.

राज कुंद्रा राजस्थान रॉयल्सचा मालक असल्याने तो क्रिकेटशी देखील संबंधित आहे. तर राज कुंद्रा आणि रहाणे यांच्यामध्ये २०१२ साली ट्विटरवर झालेले संभाषण लोकांनी बाहेर काढले आहे. यावरून रहाणे मात्र चांगलाच ट्रोल झाला आहे.

या ट्विट्समध्ये रहाणे कुंद्राला त्याचा एक शो कसा चांगला आहे याबद्दल स्तुती करत आहे, तर रहाणेला उत्तर देताना  कुंद्रा त्याला शोवर आमंत्रण देतो. लोकांनी हे बोलणे वेगळ्याच विषयाला जोडून चांगलेच मीम बनवले आहेत.

कपिल शर्माच्या शोची अशीच एक क्लिप सध्या वायरल झाली आहे. यात कपिल कुंद्राला तू नेमका पैसे कुठून कमावतो असे विचारले आहे. यावर लोकानी आता समजले कुंद्रा कुठून पैसे कमावतो अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तर एकूण नेटकऱ्यांना कुंद्राच्या रूपाने नवा बकरा सापडला आहे. 

सबस्क्राईब करा

* indicates required