काय आहे आयफोन 8 मध्ये खास? जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

मंडळी जगातल्या सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजी कंपनीने, अर्थातच अॅपलने आपली मोस्ट अवेटेड आणि मोस्ट अॅडवान्सड अशी आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस ही आयफोनची ८वी आवृत्ती मंगळवारी लॉन्च केलीय. कॅलिफोर्निया मध्ये नव्याने आणि भरमसाठ पैसा खर्चून बनवण्यात आलेल्या भव्यदिव्य अॅपल हेडक्वार्टर्समध्ये हा स्पेशल इव्हेंट पार पडला. आयफोनला १० वर्षे पुर्ण झाल्याच्या आनंदात अॅनिव्हर्सरी इडिशन म्हणून त्यांनी आयफोन X लॉन्च केलाय, आणि संस्थापक टिम कूक यांच्या मते आयफोन X हा आतापर्यंतचा सर्वात पॉवरफूल स्मार्टफोन असेल. चला थोडक्यात जाणून घेऊया या तिन्ही आयफोन्सविषयी...

आयफोन X (स्त्रोत)

आयफोन 8 हा आधीच्या आयफोन्सपेक्षा अधिक वेगवान असेल असा कंपनीने दावा केलाय. यात A11 बायोनिक चिप असेल जी मल्टीटास्किंगसाठी सर्वात वेगवान आहे. तिन्ही आयफोन्स हे बिझल लेस ठेवण्याचा प्रयत्न केला गेला असून जास्तीत जास्त स्क्रिन वापरता यावी यासाठी आयफोन X मधून होम बटनही काढून टाकण्यात आलंय.

महत्वाचं म्हणजे तिन्ही आयफोन्समध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. कंपनीने या फिचरला एअर पॉवर असं नाव दिलंय. बॅटरी क्षमतेच्या बाबतीत आयफोन X हा आयफोन 7 पेक्षा दोन तास जास्त चालेल.

तिन्ही आयफोन्समध्ये 12 MP चे वाईड अॅन्गल आणि टेलीफोटो असे ड्युअल कॅमेरा आहेत. 4K व्हीडीओ रेकॉर्डिंग, इमेज स्टॅबीलायझेशन, सुधारीत पोर्ट्रेट मोड, अॉप्टिकल झूम अशा अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असा हा कॅमेरा आहे.

स्त्रोत

सिक्युरिटीसाठी आयफोन 8 आणि 8 प्लस मध्ये सेकंड जनरेशन फिंगरप्रिंट सेन्सर्स असतील. तर आयफोन X मध्ये फेशियल रिकग्नायझेशन फिचर दिलं गेलंय. ज्यामुळे तुम्ही फक्त आयफोनकडे पाहून तो अनलॉक करू शकता.

यावेळी या आयफोन्समध्ये पहिल्यांदाच अॅपलने OLED स्क्रिन दिलेली आहे जी ट्रू टोन आणि 3D टच सारख्या फिचर्सनी युक्त आहे. सोबत तिन्ही मॉडेल्समध्ये रेटीना HD डिस्प्ले दिला गेलाय.

या आयफोन्ससोबत अॅपलने आपलं नवीन अॅनिमोजी फिचर दिलेलं आहे. इथे इमोजी तुमच्या चेहर्‍यावरील भाव रेकॉर्ड करतील. तुम्ही हसलात तर त्याही हसतील, तुम्ही डोळे झाकलात तर त्याही झाकतील! एकूण काय तर अॅनिमोजी मुळे चॅटींगची मजा वाढणार आहे.

स्त्रोत

अॉग्मेंटेड रिअॅलीटी, डस्ट/वॉटर प्रुफ, क्वाड LED फ्लॅश, ग्लास डिझाईन, iOS 11, ही या आयफोन्सची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.

तुलना करायला गेल्यास आयफोन 8 पेक्षा आयफोन 8 प्लस आणि या दोन्हीपेक्षा आयफोन X जास्त पॉवरफूल बनवला गेलाय.

महत्वाचा मुद्दा कीमतीचा. आयफोन 8 ची कींमत सुरू होते ६४,००० पासुन. तर आयफोन 8 प्लस आणि आयफोन X ची कींमत अनुक्रमे ७३,००० आणि ८९,००० रूपयांपासून सुरू होईल. 

येत्या २९ सप्टेंबर पासून या तीनही मॉडेल्सची विक्री भारतात सुरू होणार आहे...

 

सबस्क्राईब करा

* indicates required