computer

लॉकडाऊनच्या काळात अमेझॉन देणार तब्बल ५०,००० लोकांना नोकऱ्या....पूर्ण माहिती जाणून घ्या !!

कोरोनाने जगापुढे अनेक आव्हाने उभी केली आहेत. त्यातले सर्वात मोठे आव्हान म्हणजे येत असलेल्या जागतिक मंदीचे!! अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अनेकांच्या जायच्या शक्यता आहे आणि त्याचबरोबर पगार कपातीसारख्या गोष्टीसुद्धा घडताना दिसत आहेत. यासर्वांमध्ये एक आशेचा किरण म्हणावा अशी घोषणा ॲमेझॉनने केली आहे.

ॲमेझॉनने तब्बल ५०,००० सीझल नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमुळे सगळेच घरात बसून असल्याने डिलिव्हरी कंपन्यांचे काम वाढले आहे. म्हणूनच ॲमेझॉन त्यांच्या डिलिव्हरी नेटवर्कमधील वेगवेगळ्या कामांसाठी या सर्व लोकांना भरती करणार आहे. यामध्ये पार्ट-टाइम जॉबपासून स्वतंत्र कॉन्ट्रॅक्टरपर्यंत वेगवेगळ्या संधी प्राप्त होणार आहेत. 

पॅकिंग, शिपिंग, डिलिव्हरी यांसारख्या कामासाठी हजारो लोकांची भरती ॲमेझॉन करणार आहे. ॲमेझॉनच्या अखिल सक्सेना यांनी म्हटलं आहे,"कोरोनाने आम्हाला एक गोष्ट शिकवली, ती म्हणजे आम्ही कशाप्रकारे लघुउद्योग बळकट करण्यात आणि अर्थव्यवस्था वाढीत हातभार लावू शकतो. आणि आम्ही ती जबाबदारी उचलली आहे."

वाचकहो, ज्यांना नोकरीची गरज आहे अशा लोकांपर्यन्त ही बातमी पोहोचवून आपणही त्यांना होईल तसे सहकार्य करूया...

 

लेखक : वैभव पाटील.

सबस्क्राईब करा

* indicates required