अमेरिकेची चायवाली : 'देसी' चहा विकून तिने कमावले तब्बल २२७ कोटी !!

भारतीय लोकांच्या नसानसात रक्ताबरोबर चहा सुद्धा वाहत आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही राव. सकाळी उठल्यावर चहा, आळस आला की चहा, मूड असेल तेव्हा चहा, घरातला चहा, टपरीवरचा चहा, नाक्यावरचा चहा. असा हा चहा पूर्ण दिवस चालत असलेला कार्यक्रम आहे. आज चहाची आठवण काढण्याचं कारण म्हणेज एक बातमी जी सगळीकडे फिरत आहे.

तर बातमी अशी आहे की भारतीयांची जान असलेल्या चहाने एका गोरी मेमला भुरळ घातली आहे. तिचं एकंदरीत आपल्या भारतीयांप्रमाणे झालं. ती सुद्धा चहाच्या प्रेमात पडली. पण हे चहा प्रेम तिने चक्क करियर म्हणून निवडलं आणि ती थेट अमेरिकेत चहा विकू लागली. या व्यवसायातून तिने तब्बल २२७ कोटी कमावले आहेत.

ती आली, तिने पाहिलं आणि ती चायवाली झाली.

स्रोत

ब्रूक एडी असं नाव असलेली अमेरिकन महिला २००२ साली भारतात आली. या ब्रूक ताईंनी उत्तर भारतातल्या वेगवेगळ्या प्रकारचा चहा चाखला. त्यांना समजलं की भारतात प्रत्येक शहरात, प्रत्येक ठेल्यावर वेगळ्या प्रकारचा चहा मिळतो. ती जेव्हा अमेरिकेला परत गेली तेव्हा तिला लक्षात आलं की भारतात मिळणाऱ्या चहाच्या तोडीचा चहा अमेरिकेत कुठेही मिळत नाही. इथूनच तिला नवीन व्यवसायाची कल्पना सुचली.

तिने 'कोलोरॅडो'मध्ये आल्यानंतर चहाचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार केला. काही काळाने ती आपल्या कारच्या मागच्या बाजूला चहा विकू लागली. तिने भारतात मिळतो तसाच चहा अमेरिकेत विकण्याचा प्रयत्न केला. हा एक साधा सरळ आलं घातलेला चहा होता. पण त्याला भारतीय टच असल्याने तिथल्या लोकांना तो प्रचंड आवडला. अमेरिकेतल्या कोणत्याही कॅफेत मिळणार नाही असा हा चहा होता.

स्रोत

तिच्या व्यवसायाने उचल खाल्ली ती २००७ साली. तिने ‘भक्ती चाय’ या नावाने चहा विकणारी कंपनी सुरु केली. तिचा व्यवसाय चहाच्या आशीर्वादाने बहरला आणि चहाची मागणी देखील वाढली. आज ती वेगवेगळ्या प्रकारातील चहा विकते. तिचा व्यवसायात चांगला जम बसला आहे. नुकत्याच तिने दिलेल्या एका इंटरव्ह्यू नंतर तिच्या चहा व्यवसायाची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

मंडळी आपला देसी चहा विदेशी मंडळींना प्रेमात पाडू शकतो हे यावरून सिद्ध होतं.

 

आणखी वाचा :

चहाची किंमत १० आणि कमाई तब्बल १२ लाख....पुण्याच्या चहावाल्याची यशोगाथा वाचली का ??

सबस्क्राईब करा

* indicates required