computer

पुणेकरांना शेतकऱ्यांकडून घरपोच भाजीपाला मिळणार... वाचा पूर्ण माहिती!!

भारतात सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे, पण जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरूच ठेवण्यात आलाय. तरी रोजचा भाजीपाला, फळे यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झालेला दिसतो. साहजिकच लॉकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे आवक घटली आहे. शिवाय होलसेल व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

पुण्यात मात्र ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही. का ? कारण पुणेकरांना भाजीपाला, फळे घरपोच मिळणार आहेत.

 

त्याचं काय आहे, पुणे महानगरपालिकेचे उप नगर आयुक्त माधव जगताप यांनी सांगितल्याप्रमाणे पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातल्या प्रत्येक सोसायटीमध्ये भाज्या पोहोचवण्यासाठी एक व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे. जवळवल ४०० शेतकरी संघटना या कामात सहभागी असतील. राज्य कृषी विभागाचाही याला पाठिंबा असणार आहे.

सध्याच्या माहितीनुसार सोसायटीच्या बाहेर भाज्यांची गाडी लावली जाईल. गर्दी होणार नाही आणि शेतकऱ्यांना संसर्ग होणार नाही आणि माणसांमध्ये अंतर राहील याची काळजी घेतली जाईल.

अशाप्रकारे २१ दिवस कोणताही अडथळा न येता नागरिकांना ताज्या भाज्या मिळतील यासाठी प्रयत्न होणार आहे. या कामात सहभागी झाल्याबद्दल कृषी विभाग आणि शेतकऱ्यांचं कौतुक करायला हवं.

सबस्क्राईब करा

* indicates required