सेक्रेड गेम्समध्ये 'फक्त त्रिवेदीच का वाचणार' या प्रश्नाचं उत्तर मिळेल लवकरच....दुसऱ्या सीझनची घोषणा बघा भाऊ !!
२५ दिवसात काय होणार ? फक्त त्रिवेदीच का वाचणार ? या कथेत गायतोंडेच्या तिसऱ्या बापाची भूमिका काय ? अश्या अनेक प्रश्नांना अनुत्तरित ठेवून सेक्रेड गेम्सचा पहिला सिझन संपला. पहिल्या सिझनने प्रेक्षकांची भूक प्रचंड वाढवली. नेटफ्लिक्स हल्ली भारतीयांना खुश करण्यात मागे पुढे बघत नाहीये. त्यामुळे त्यांनी कालच सिझन २ ची घोषणा देखील केली. आणि घोषणा करणारा एक खास व्हिडीओ सुद्धा आलाय राव. बघून घ्या !!
या व्हिडीओ मध्ये मुख्य पात्रांचे आवाज आणि समोर सेक्रेड गेम्सच्या कथेचं मुख्य चिन्ह एवढंच दिसत आहे. नवीन तसं काहीच नाही, त्यामुळे थोडी निराशा होते. शेवटी मार्केटिंगचा फंडा आहे बॉस. एवढ्या लवकर सगळं सांगितलं तर मजा काय.
दुसऱ्या भागात काय असेल हे अजून तरी गुलदस्त्यात आहे पण हो, एक मुख्य बदल झालाय. पहिला भाग विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केला होता, पण दुसऱ्या भागात ही जोडी नसेल. विक्रमादित्य मोटवानीची जागा नीरज घायवान घेणार आहेत. हे तेच दिग्दर्शक आहेत ज्यांनी मसान मधून विकी कौशलला (संजूच्या कमलीला) लाँच केलं होतं.
मंडळी, प्रचंड उत्सुकता आहे, प्रश्न अनेक आहेत, आता उत्सुकता आहे ट्रेलरची. त्यापूर्वी या व्हिडीओ बद्दल बद्दल तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला जरूर सांगा !!