या माणसाने उबवली अंडी...जाणून घ्या या माणसाचे अनोखे कारनामे !!!

Subscribe to Bobhata

अंड्यांना उबवण्यासाठी कोंबडी कशाला हवी, ते काम माणूसही करू शकतो की !!! असं ऐकून तुम्ही म्हणाल काय राव आज सकाळ सकाळीच घेतली का ???....पण तस काही नाहीये...

तर असला जगावेगळा उपद्व्याप करणारी एक वेगळीच जमात असते मंडळी. त्यांच्यात एक महान नग म्हणजे अब्राहम पॉइनशेवेल. याने काय केलं तर चक्क तीन आठवड्यात १० अंडी उबवली. कळस म्हणजे १० मधल्या ९ अंड्यांमधून पिल्लही बाहेर पडली आहेत. २५ ते २६ दिवसात पिल्लांचा जन्म होणार असा त्याचा अंदाज होता आणि तो अंदाज खरा ठरला.

तीन आठवड्यांच्या काळात अब्राहम अगदी कोंबडीसारखा एकाच जागी बसून होता. अंगावर ब्लँकेट, दिवसातून फक्त अर्धा तास जागेवरून उठणे, तापमान स्थिर ठेवण्यासाठी आल्याचा रस पिणे. एकंदरीत काय तर मानवी कोंबडीच जणू. मंडळी हा सर्व प्रकार घडत होता पॅरीसच्या म्युझियम मधल्या एका काचेच्या केबिन मध्ये.

Image result for artist hatching eggsस्रोत

 

अब्राहम हा एक कलाकार आहे आणि त्याला असले अनुभव घ्यायला अवडतं. या प्रकारावर अनेकांनी सडकून टीका केली पण अब्राहमने त्या सगळ्यांना फाट्यावर मारत अंडी उबवण्याचा कार्यक्रम यशस्वी केलाय.

तर शेवटी काय तर रिकामटेकड्या, बेरोजगार, आळशी लोकांसाठी त्याने एक मस्त पर्याय सुचवला आहे. घरी बिनकामाचे पडून आहात, भरपूर वेळ आहे ? मग चला बसल्या बसल्या अंडी उबवा...काय आहे तेवढीच त्या कोंबडीला सुट्टी....नाही का !!!

हे सर्व वाचून तुम्हाला वाटत असेल ‘काय फालतुगिरी आहे राव.’ जर हि फालतुगिरी असेल तर मग तुम्ही अब्राहमच्या आधीच्या कामाकडे बघून काय म्हणाल ?

उदाहरणार्थ....
१. एका अवजड खडकाच्या आत स्वतःला ७ दिवस कोंडून घेणे.


२. अस्वलाच्या कातडीत आठवडाभर राहणे.


३. आठवडाभर एका खड्ड्यात राहणे.


४. ६० फुटाच्या खांबाच्या टोकावर सात दिवस वास्तव्य.

सर्व फोटो स्रोत

अशी लहान सहन कामे त्याने या आधी केली आहेत.

एखाद्या टोकाच्या गोष्टीचा अनुभव घेण्याच्या या प्रकारा बद्दल तुम्हाला काय वाटतं ? तुमचे मत आम्हाला नक्की कळवा !!!

सबस्क्राईब करा

* indicates required