मी १६.६६% हिंदू : नवाजुद्दीन सिद्दीकीची DNA टेस्ट!!

Subscribe to Bobhata

बॉलीवूडचा गुणी कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकीनं सोशल मिडीयावर एक व्हीडीओ पोस्ट केलाय. ज्यात तो वेगगळी पोस्टर्स दाखवून सांगतोय असं की,

"मी नवाजुद्दीन आहे. मी माझी डीएनए टेस्ट केली. रिपोर्ट असा आला की मी १६.६६% हिंदू, १६.६६% मुस्लिम, १६.६६% ख्रिश्चन, १६.६६% शिख, १६.६६% बौध्द आणि १६.६६% जगातील अन्य धर्माचा आहे. आणि जेव्हा मी आत्मपरीक्षण केलं तेंव्हा समजलं की मी १००% कलाकार आहे."

 देशातील धार्मिक सहिष्णुतेवर आधारलेला हा व्हिडीओ एका संकेतस्थळावरून प्रसिद्ध झाला, आणि तो बराच वायरलही होतोय.

आठवडाभरापूर्वी सोनू निगमने आपण मुस्लिम नसूनही आपल्याला अजानच्या आवाजाने जाग येते, असं ट्विट करून वाद ओढवून घेतला होता. नवाजुद्दीनचा हा व्हिडीओ म्हणजे सोनूसाठी खास संदेश तर नसेल ? 

सबस्क्राईब करा

* indicates required