computer

यांच्यापैकी कोण होणार देशाचा राष्ट्रपती : वाचा आणि तुमचं मत सांगा !!!

जुलै महिन्यात राष्ट्रपती पदाची निवडणूक येत आहे. निवडणूक दोन महिन्यांनी असली तर वातावरण आत्ता पासूनच तापलंय मंडळी. राष्ट्रपती कोण होणार याची चर्चा चावडी पासून ते थेट दिल्ली दरबारापर्यंत सुरु आहे. लोकप्रतिनिधि कोणाची निवड करणार ? राष्ट्रपती पदासाठी कोण योग्य असेल ? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतीलच.

शेवटी राष्ट्रपती कोणीही होवो पण तुम्हाला काय वाटतं कोण व्हावा आपला भावी राष्ट्रपती ???....तुमचा गोंधळ होत असेल तर आम्ही तुम्हाला काही उमेदवारांची नावे सुचवतो त्यातून तुम्हीच निवडा आपला राष्ट्रपती !!!

१. लालकृष्ण अडवाणी !

मोदी आणि अडवाणी यांचे सध्याचे संबंध बघता मोदी राष्ट्रपती पदासाठी अडवाणींची निवड करतील असं दिसत नाहीये पण भाजप कार्यकर्त्यांच्या मनात अडवाणीच राष्ट्रपती व्हावेत असं आहे. या तफावती मधून काय निकाल लागतोय ते पाहण्या सारखं असेल !!!

२. अमिताभ बच्चन !

राजकारणाच्या बाहेर असणाऱ्या व्यक्तीची निवड राष्ट्रपती म्हणून करणे हे आपल्याला अब्दुल कलामांच्या उदाहरणावरून दिसून येईल. सर्व बिगर राजकारणी व्यक्तींमध्ये अमिताभ बच्चन याचं नाव समोर येण्याचं कारण म्हणजे आजकल प्रत्येक सरकारी जाहिरातीत अमिताभ बच्चन असतातच.

खर तर अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता पाहता जनता जनार्दनाच्या मनात बिग बी चं आहे !!!

३. द्रौपदी मुर्मू !

ओडीसाच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी सध्या आघाडीवर आहे. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातल्या असल्यामुळे जर त्यांची निवड झाली तर भारताला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता आहे.

४. सुमित्रा महाजन !

अपेक्षित उमेदवारांच्या यादीत आणखी एक आघाडीचं नाव म्हणजे सुमित्रा महाजन ! सुमित्रा महाजन या इंदौरच्या खासदार पदी आठ वेळा विराजमान झाल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या पाठीशी उभा असल्याने सुमित्रा महाजन पुढच्या राष्ट्रपती होणार असं म्हटलं जातंय !

५. रतन टाटा !

राजकारणात नसलेल्या व्यक्तींमधलं आणखी एक नाव म्हणजे रतन टाटा ! भारताच्या इतिहासात टाटा कुटुंबियांच्या योगदाना बद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे. रतन टाटा यांची कार्यप्रणाली, राजकारणाशी संबंध नसणे यामुळे ते पुढील राष्ट्रपती होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

६. थावरचंद गहलोत !

भाजपचे दलित नेते म्हणून थावरचंद गहलोत म्हणून ओळखले जातात. युपी मध्ये झालेल्या निवडणुकीत दलितांनी दिलेली साथ बघता मोदी थावरचंद गहलोत यांची निवड करू शकतात. पण अजून तरी याबद्दल ठोस माहिती मिळू शकलेली नाही.

 

 

तर आता सांगा राष्ट्रपती पदासाठी तुमचं मत कोणाला ???

सबस्क्राईब करा

* indicates required