येत आहे 'चि. व चि.सौ.कां' ची जोडी : टिझर पाहून घ्या मंडळी!!!

Subscribe to Bobhata

चजआ चम्हीआ चमचीतु चणिआ ‘चि.व.चि.सौ.कां’ चचीयां चटभे चरूनक चणारदे आहोतआ. चम्हीतु चपखू चहिलेपा चसतीलअ चपरमॅनसु, चटमॅनबॅ चणप चधीक चहिलेप चसतीलन ‘चलारपुत्रसो’ आणि ‘चजकन्यावे’.

चरत चऊनचे चलोआ चहोतआ ‘चि.व.चि.सौ.कां’ चनेमाचंसि भन्नाट टीझर चटढॅणढँ !!!

राव समजली का ‘च’ ची भाषा ??? समजली नसेल आणि तुमचे डोळे गरगरत असतील तर शुद्ध मऱ्हाटीत समजावतो....

आज आम्ही तुमची आणि ‘चि.व.चि.सौ.कां’ यांची भेट करून देणार आहोत. तुम्ही खूप पाहिले असतील सुपरमॅन, बॅटमॅन.  पण कधी पहिले नसतील ‘सोलारपुत्र’ आणि ‘वेजकन्या’.

तर घेऊन आलो आहोत ‘चि.व.चि.सौ.कां’ सिनेमाचं भन्नाट टीझर....ढँटढॅण....!!!

आता पुन्हा वर जाऊन लिहिलेलं तपासू नका मंडळी.

एक महत्वाची खबर द्यायची आहे तुम्हाला. पृथ्वीचं तापमान वाढलंय.  जीव, जंतू, आकाश, पाताळ, ट्विटरवाले, फेसबुकवाले धोक्यात आहेत. असल्या भयंकर संकटातून वाचवण्यासाठी दिग्दर्शक ‘परेश मोकाशी’ घेऊन आले आहेत ब्रम्हांडाचे तारणहार ‘चि.व.चि.सौ.कां’.

ते कोण आहेत, ते काय करणार आहेत, त्याचं उद्देश्य काय ? जाणून घेण्यासाठी टीझर पहा !!!

सबस्क्राईब करा

* indicates required