गणपतीला मांस खाताना दाखवणं ही या जाहिरातीची सर्वात मोठी चूक आहे..

मंडळी वादग्रस्त गोष्टींमधून वादळ उठवायचं आणि माणसाचं लक्ष खेचायचं हा एक मोठा मार्केटिंग फंडा आहे. आता हेच बघा ना, ऑस्ट्रेलियामधल्या ' Meat and Livestock ' या मांस विकणाऱ्या कंपनीने 'मेंढीचं मांस' (lamb) विकण्यासाठी एक वादग्रस्त जाहिरात तयार केली आहे आणि त्यामुळे नवीन वाद सुरु झालाय. 
झालंय असं की या जाहिरातीत जगभरातल्या सगळ्या देवांना एका टेबलावर मेंढीच्या मटणावर ताव मारताना दाखवलं आहे. यात वादग्रस्त म्हणजे या पंगतीत आपले गणपती देखील आहेत. गणपतीेसारख्या देवतेला अशी कृती करताना दाखवणं म्हणजे मोठाच वाद ओढवून घेणं आलं. आता ही गोष्ट जाणूनबुजून झाली असेल किंवा कमी अभ्यासामुळे झाली असेल.. पण नवीन वाद सुरु झालाय हे मात्र नक्की. 

राव, ऑस्ट्रेलियामधल्या हिंदू समुदायाने यावर आक्षेप घेतला आहे आणि या जाहिरातीवर त्वरित बंदी आणण्याची मागणी करण्यात आली आहे.ऑस्ट्रेलियातल्या हिंदू समुदायाचे प्रवक्ते नितीन वसिष्ठ म्हणतात, " या जाहिरातीत नैतिकतेची कमतरता दिसून येत आहे त्यामुळे यावर त्वरित बंदी आणली गेली पाहिजे ". वाद वाढलेला असताना या कंपनीने मात्र आपली बाजू धरून ठेवली आहे. चांगली निगरगट्ट् दिसतेय कंपनी..

मंडळी, शेवटी काय तर उगाच माणसांच्या भावनांना डिवचायचं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. नाही का?

यावर तुम्हाला काय वाटत ते आम्हाला नक्की कळवा !!

सबस्क्राईब करा

* indicates required