या दीड लाखाच्या थैलीला नेटकरी का ट्रोल करत आहेत?

लेब्रिटी लोकांकडच्या महाग वस्तूंबद्दल आपण नेहमी ऐकत असतो. हार्दिक पांड्याच्या ५ कोटींच्या घड्याळाची चर्चा दोन दिवसांपूर्वी चांगलीच रंगली होती. आता तर हिरोइन्सच्या पर्सही काही लाखांच्या असतात अशा बातम्या येत असतात. आपल्यासारख्या सामान्य लोकांना पडणारा प्रश्न म्हणजे नेमक्या या वस्तूंमध्ये असे काय असते ज्यामुळे यांची किंमत अव्वाच्या सव्वा असते?

यावर उत्तर म्हणून 'असेल बुवा काही महाग मटेरियल त्यात वापरले' म्हणून आपण तो विषय सोडून देत असतो. पण बॅलेंसिअगाची एक बॅग मात्र लोकांना जास्तच आश्चर्यचकित करत आहे. या बॅगची किंमत आहे तब्बल दीड लाख रुपये. या बॅगकडे बघितल्यावर मात्र कुणालाही हे खरे पटणार नाही.

आपल्या घरी भाजीपाला आणायला वापरली जाणारी पिशवी, ज्याला आपण थैली किंवा झोला म्हणतो तिच्यात आणि या बॅगेत तुम्हाला विशेष फरक दिसणार नाही. साहजिक घराच्या एका कोपऱ्यात पडून असलेल्या पिशवीसारख्याच एका बॅगेला दीड लाखांचा भाव मिळत असेल तर चर्चा होणारच.

नेटकरी लागलीच या बॅग बनवणाऱ्या कंपनीला ट्रोल करायला लागले. अनेकांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. खरं म्हणजे यांनी ही बॅग नेमके काय म्हणून बनवली जीची किंमत तब्बल दीड लाख ठेवली आहे हाही संशोधनाचा एक विषय होऊ शकतो.

सबस्क्राईब करा

* indicates required