हा मनुष्य कामावर चक्क स्पायडरमॅनच्या वेशात का आला ?? पाहा हा व्हिडीओ !!

जर एखादा माणूस अनेक वर्षांपासून एकाच कंपनीत काम करत असेल तर कामाच्या शेवटच्या दिवशी त्याला भरून आलं तर वावगं ठरणार नाही. पण ब्राझीलच्या या बँक कर्मचाऱ्याने हा दिवस जास्त ‘सेंटी’ न करता एकदम मजेशीर केला आहे. हा पाहा व्हिडीओ.
मंडळी, कामाच्या शेवटच्या दिवशी स्पायडरमॅनच्या वेशात कोण येतं ? आजवर असं घडलं नव्हतं, पण आता घडलं आहे. स्टॅनली तात्या जर हे बघत असतील तर नक्कीच त्यांना आनंद झाला असेल.
तर, या माणसाचं नाव समजलेलं नाही. तो ब्राझीलच्या साओ पाओलो येथील बँकेत काम करणारा कर्मचारी आहे एवढी माहिती मिळाली आहे. या साध्या बँक कर्मचाऱ्याने कामाचा शेवटचा दिवस स्वतःला आणि इतरांना लक्षात राहील अशी शक्कल लढवली आहे. तो ऑफिसमध्ये नव्या अवतारात आल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचा व्हिडीओ व फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केला. त्यानंतर तो जगभर चर्चेचा विषय बनला आहे.
मंडळी, नव्या स्पायडरमॅनचा हा ‘कुल लुक’ नेटकाऱ्यांना भलताच आवडला आहे. तुम्हाला ही भन्नाट आयडिया आवडली का ?? सांगा बरं !!