computer

काय सांगता ? पृथ्वीवर चक्क माणूसच एलियन आहे ??

मंडळी, आपले शास्त्रज्ञ मंडळी अनेक वर्षांपासून एलियन्सच्या शोधात आहे. या एलियन संकल्पनेने कितीतरी अचाट गोष्टींना जन्म दिला. सिनेमे वगैरे आहेतच ओ पण लोक खऱ्या आयुष्यातही एलियन्सना बघितल्याचा दावा करतात. ते हिस्टरीवाल्यांनी तर कसल्या कसल्या थियरी मांडून लोकांना भंडावून सोडलं.

आता एक नवीन थियरी आली आहे. या थियरीने आपल्या सगळ्यांनाच एक जबरदस्त झटका मिळणार आहे.

तर, एका नव्या वैज्ञानिक थियरीनुसार एका परग्रहाच्या धडकण्याने पृथ्वीवर जीवनाला सुरुवात झाली. म्हणजे ते बिग बँग वगैरे सब झूट !! हा ग्रह मंगळ इतका मोठा होता. या धडकेने त्या परग्रहाचे तुकडे झाले आणि त्यातला एक तुकडा कायमचा पृथ्वीभोवती फिरू लागला. बरोबर ओळखलं हा तुकडा म्हणजे आपला चंद्र.

मंडळी, या थियरीला जोडून आणखी एक गोष्ट सांगण्यात येत आहे. या परग्रहावर आधीपासूनच जीवन होतं. धडकेनंतर हे जीवन पृथ्वीवर उतरलं. सोप्प्या शब्दात, या थियरीनुसार आजचा माणूस हा परग्रहावरून आला आहे. म्हणजे आपण स्वतःच एलियन आहोत.

गोष्ट इथेच संपत नाही. हे घडलं त्यावेळी आपली सौर यंत्रणा अजून तयार व्हायची होती. त्यामुळे पृथ्वीवर जीवन तयार होणं शक्यच नव्हतं. या स्फोटानेच पृथ्वीच्या वातावरणात अमुलाग्र बदल केले ज्यामुळे हा ओसाड ग्रह जीवनासाठी पोषक ग्रह बनला. असं म्हणतात की स्फोटातून जे अवशेष उरले त्यातूनच पुढे वातावरणात कार्बन आणि नायट्रोजन सारखे महत्वाचे घटक विखुरले गेले. हे दोन्ही घटक जीवनावश्यक आहेत.

मंडळी, ही गोष्ट कोणत्याही पुराणकथांमधील किंवा सायफाय सिनेमातील, एवढंच काय whatsapp विद्यापीठातील पण नाहीय. या थियरीला बड्या शास्त्रज्ञांनी मान्यता दिली आहे. ही थियरी ‘Science Advances’ या प्रसिद्ध मासिकाने नुकतीच जगासमोर आणली. तशी या प्रकारची थियरी अनेक वर्षांपासून फिरत आहे, पण आता खुद्द शास्त्रज्ञांनी ते मान्य केलं एवढंच.

मंडळी, आता तुम्हीच सांगा ही नवीन वैज्ञानिक थियरी तुम्हाला पटते का ??

सबस्क्राईब करा

* indicates required