३ रुपयांच्या कागदी पिशवीसाठी बाटाला भरावा लागला एवढा मोठा दंड !!

आता प्लास्टिक पिशव्या बंद झाल्या आहेत आणि कागदी पिशव्यांचा वापर होत आहे. बऱ्याच दुकानात या कागदी पिशव्या मोफत मिळतात. पण समजा तुम्ही बाटा सारख्या मोठ्या दुकानात गेलात आणि त्यांनी कागदी पिशवीसाठी वेगळे ३ रुपये आकारले तर ? अशावेळी तुम्ही ते ३ रुपये द्यालही पण इथे घडलं भलतंच आहे. बाटाला तब्बल ९००० रुपयांचा दंड बसलाय भाऊ.

स्रोत

चंदीगड ग्राहक न्यायालयात एका ग्राहकाने बाटा विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्याचं झालं असं की दिनेश रातुरी हा ग्राहक बाटाच्या शोरूम मध्ये गेला होता. ४०२ रुपयाची खरेदी केल्यावर त्याच्याकडून कागदी पिशवीसाठी ३ रुपये वेगळे आकारण्यात आले. दिनेशने कोर्टात म्हटलंय की बाटाने पैसे तर आकारलेच पण पिशवीवर स्वतःची जाहिरातही केली आहे.

मंडळी, ग्राहकाच्या तक्रारीवर बाटाने आपली चूक मान्य केली आहे. कोर्टाने बाटाला चांगलंच खडसावलं आहे. कोर्टाने म्हटलं की “कंपनीला पर्यावरणाची एवढीच काळजी असेल तर त्यांनी मोफत पिशव्या द्याव्यात”.

स्रोत

हे इथेच न थांबता ग्राहकाच्या मानसिक त्रासासाठी बाटाला ३००० रुपये दंड भरावा लागला आहे, ५००० रुपये राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाला दान द्यावे लागले आहेत. याखेरीज खटल्यासाठी १००० रुपये आणि जे पिशवीसाठी ३ रुपये घेतलेले तेही परत करावे लागले आहेत. एकूण बाटावर ९००० रुपयाचा दंड आणि नाव खराब होण्याचं संकट एकत्र ओढवलंय राव.

सबस्क्राईब करा

* indicates required