computer

केवळ २ मिनिटांत चक्क ३ रुबिक क्यूब्स सोडवणारा अफलातून हुशार मुलगा!! हे कसं केलं याचा व्हिडीओ पाहायलाच हवा!

लहान मुलं किती लवचिक असतात, कोणतीही गोष्ट ते पटकन शिकतात. मग तो एखादा नवीन खेळ असो किंवा काही अवघड व्यायाम प्रकार. त्यांना एखादा खेळ आवडला तर ते इतका सराव करतात की मोठ्यांना अगदी सहज हरवतात. बंगलोरच्या अथर्व आर भट या मुलानेही स्वतःच्या कौशल्याने सर्वाना थक्क करून सोडले आहे. अथर्वची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेऊन नुकताच त्याचा व्हीडीओ पोस्ट केला आहे.

रुबीक्स क्यूब या अगदी दिसायला सोप्या पण तेवढ्याच अवघड खेळत हा मुलगा इतका तरबेज आहे की, केवळ काही सेकंदातच तो ते सोडवू शकतो. ‘रुबिक क्यूब’ म्हणजे रंगीबेरंगी चौकोन फिरवून त्याच्यावरच्या रंगाचा मेळ पूर्णपणे बदलून टाकायचा आणि नंतर एकाच रंगाचे चौकोन एकाच पृष्ठभागावर लावायचे. अथर्वचं कौतुक यासाठी की त्याने केवळ १ मिनिट २९.९७ सेकंदात एकाच वेळेस ३ रुबीक्स क्यूब सोडवले आहेत. दोन रुबीक्स क्यूब हातांनी तर तिसरे पायाने. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जेव्हा त्याचा व्हिडीओ पोस्ट केला तेव्हा त्याचे शिर्षक होते, "2hands +2 Feet = 3Cubes Solved" तुम्ही हा व्हिडीओ एकदा पाहूनच घ्या.

यात फक्त हाताचे कौशल्य नाही तर बुद्धीचाही कस लागतो. त्याने डिसेंबर मध्ये हा व्हिडीओ जागतिक विक्रमासाठी पाठवला होता. त्याचे योग्य मूल्यमापन झाल्यावर आता त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले जात आहे. याआधी हा रेकॉर्ड चीनच्या मुलाच्या नावावर होते. त्याचे वय अथर्व पेक्षा जास्त आहे. अथर्वच्या वडिलांना या रुबीक्स क्यूब खेळाची आवड होती. त्यांचं पाहून अथर्वही शिकला. त्याची आवड पाहून बाबांनी खूप प्रोत्साहन दिले. ऑनलाइन क्लासमुळे घरात असलेल्या अथर्वला यूट्यूबच्या माध्यमातून अजून माहिती मिळाली. ९ महिने सराव केल्यानंतर तो अगदी सहज हे कोडे सोडवू लागला. त्याच्या वडिलांनी मग घड्याळ लावून क्यूब सोडवण्याचा सराव सुरू केला. 

अथर्वने घेतलेली मेहनत त्याच्या कामातून दिसत आहे. त्याचा व्हिडीओ पाहिल्यावर सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required