computer

हे आहेत १० हजार रूपयांमध्ये मिळणारे या महिन्यातले सर्वोत्तम स्मार्टफोन्स...‌

मंडळी, लॉकडाऊन शिथील झालंय. अशात जर तुम्ही नवा स्मार्टफोन घ्यायच्या विचारात असाल, तर आमचं हे लिस्टीकल जरून पाहून घ्या. सरकारने स्मार्टफोन्सवरीर GST वाढवल्यामुळे सगळ्याच स्मार्टफोन्सच्या कींमतीत किंचित वाढ झालीये. त्यामुळे आम्ही इथं दिले आहेत १० हजारांमध्ये मिळणारे सर्वोत्तम स्मार्टफोन्स जे फिचर्सच्या बाबतीत पैसा वसूल ठरतील...

Realme C3

किंमत -७९९९ रूपये. (३ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंट)

रिअलमीचा हा ८ हजारांत मिळणारा स्मार्टफोन अनेक दमदार फिचर्ससहित येतो. यामध्ये ६.५ इंचाचा LCD डिस्प्ले आहे, यासोबत गोरिला ग्लासचं सुरक्षाकवच मिळतं.

Realme C3 मध्ये १२ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा येतो. या मोबाईलमध्ये तुम्ही स्लो मोशन व्हिडीओ रेकॉर्डिंगही करू शकता. यामध्ये MediaTek चा Helio G70 प्रोसेसर दिलेला आहे. हा प्रोसेसर असल्याने तुम्हांला गेम्स खेळता येतील. त्याचबरोबर यामध्ये रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह येणारी 5000 mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे. या बॅटरीमुळे तुम्ही या फोनचा उपयोग करून दुसरा स्मार्टफोन चार्ज करू शकता.

Realme Narzo 10A

किंमत - ८४९९ रूपये (३ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंट)

रिअलमीचा हा नुकताच लॉन्च झालेला नवाकोरा स्मार्टफोन आहे. यामध्ये ६.५ इंचाचा‌ HD+ IPS LCD डिस्प्ले गोरिला ग्लासच्या प्रोटेक्शनसह मिळतो.

गेमिंग साठी MediaTek चा Helio G70 Octa Coar प्रोसेसर यामध्ये आहे. १२ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल असे तीन रिअर कॅमेरे आणि ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा यात दिला गेलाय. स्लो मोशन व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट आहे. रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करणारी रिअलमी Narzo 10A ची 5000 mAh क्षमतेची बॅटरी यासोबत येते.

Samsung Galaxy M10S

किंमत -८९९९ रूपये (३ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंट)

जर तुम्हाला १० हजार रूपयांमध्ये सॅमसंगचाच फोन हवाय तर हा तुमच्यासाठी छान पर्याय आहे. यामध्ये ६.४ इंच HD+ sAMOLED डिस्प्ले मिळतो. या किंमतीत तुम्हाला AMOLED डिस्प्ले Samsung शिवाय इतर कोणत्याही स्मार्टफोनमध्ये मिळणार नाही. सॅमसंगचा स्वत:चा Exynos 7884B Octa Coar प्रोसेसर यामध्ये आहे. १३ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा यामध्ये आहे.

या फोनसोबत15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी 4000 mAh क्षमतेची बॅटरी दिली गेलीय. तसेच फोनमध्ये तुम्हांला डॉल्बी ॲटमॉस आणि वाईडवाईन L1 चा सपोर्ट मिळतो.

Redmi 8

किंमत -९२९९ रूपये (४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट)

६.२ इंच HD+ LCD डिस्प्ले, गोरिला ग्लास - ५ च्या प्रोटेक्शनसहित येतो. या फोनमध्ये Qualcomm® Snapdragon™ 439 हा प्रोसेसर आहे. AI फेस अनलॉक, फिंगरप्रिंट सेन्सरही दिलं गेलंय. १२ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल ड्यूअल रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सल AI सेल्फी कॅमेरा यामध्ये आहे.
या फोनसोबत 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी 5000 mAh क्षमतेची बॅटरी येते.

Realme 5i

किंमत -९९९९ रुपये (४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट)

या किंमतीत फोटोग्राफी, गेमिंग, आणि इतर बाबतीत ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा हा स्मार्टफोन आहे. यामध्ये ६.५ इंच HD+ LCD डिस्प्ले गोरिला ग्लास प्रोटेक्शनसह मिळतो. यात क्वाड म्हणजे चार कॅमेऱ्यांचा सेटअप दिला गेलाय. म्हणजेच यात १२ मेगापिक्सल मेन कॅमेरा + ८ मेगापिक्सल वाईड अँगल कॅमेरा + २ मेगापिक्सल पोट्रेट कॅमेरा + २ मेगापिक्सल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही यात आहे.

या फोनमध्ये तुम्ही 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि स्लो मोशन व्हिडीओ रेकॉर्डिंगही करू शकता. फोनमध्ये Qualcomm® Snapdragon™ 665 AEI Octa Coar चा प्रोसेसर वापरला आहे तर LPDDR4x ची रॅम वापरली आहे. तसेच फोनसोबत 5000 mAh बॅटरी येते. आणि हो, रिअलमी 5i मध्येही रिव्हर्स चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.

 

आहेत ना एकापेक्ष एक मस्त आणि तसे पाहायला गेलो तर स्वस्त असे स्मार्टफोन्स?? यातला कोणता घेण्याचा विचार करत आहात?

सबस्क्राईब करा

* indicates required