हे आहेत १५ हजारात मिळणारे सर्वोत्तम स्मार्टफोन्स : खरेदीआधी हे पाहून घ्या...

मागच्यावेळी आपण १० हजार रूपयांमध्ये मिळणारे बेस्ट स्मार्टफोन्स पाहिले होते. पण ज्यांचं बजेट थोडं जास्त, आणि ज्यांना थोड्या अधिक चांगल्या फिचर्सनी युक्त असा स्मार्टफोन घ्यायचाय, खास त्यांच्यासाठी आज आम्ही घेऊन आलोय हे लीस्टिकल. इथं आम्ही देतोय १० ते १५ हजार रूपयांमध्ये मिळणारे ५ असे स्मार्टफोन जे त्या किंमतीत सर्वोत्तम आणि पैसा वसूल ठरतात. हे पाहून तुम्ही ठरवू शकता की तुमच्या बजेटनुसार कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी 'बेस्ट डिल' ठरू शकतो.
जर तुम्ही चायनीज प्रोडक्ट म्हणून Realme, Redmi किंवा Vivo चे स्मार्टफोन्स न घेण्याचा विचार करत असाल तर आपण लक्षात घ्यायला हवं की या सर्व चायनीज कंपन्यांचे स्मार्टफोन बनवायचे कारखाने हे भारतातच आहेत. हे सर्व स्मार्टफोन्स 'मेड इन इंडिया' आहेत. सध्या तरी एकही भारतीय कंपनी या स्मार्टफोन बाजारात कार्यरत नाही. त्यामुळे अगदीच चीनी गोष्टी टाळायच्या असतील तर तुम्ही Samsung या कोरीयन कंपनीचा विचार करू शकता.
Vivo U20
किंमत - ११,९९० रूपये ( 4 GB रॅम + 64 GB स्टोरेज व्हेरीएंट)
डिस्प्ले - ६.५ इंचाचा Full HD+ IPS LCD डिस्प्ले. या किंमतीत मिळणारा हा सगळ्यात मोठा डिस्प्ले आहे.
प्रोसेसर - मल्टीटास्कींग आणि गेमिंगसाठी Qualcomm Snapdragon 675 AIE Octa Coar Processor
रिअर कॅमेरा - 16 + 8 + 2 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा (वाईड ॲन्गल, नाईट मोड आणि Sony IMX499 सेन्सरसहित
फ्रंट-सेल्फी कॅमेरा - 16 मेगापिक्सेल
बॅटरी - 5000 mAh (18 वॅट फास्ट चार्जरसोबत) मोठी बॅटरी असल्याने हा स्मार्टफोन रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करतो. म्हणजेच तुम्ही या फोनचा वापर दुसरा स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी करू शकता.
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Pie 9.0 वर आधारीत Funtouch OS
यामध्ये स्टोरेज रिडींग स्पीड हे वेगवान असं UFS 2.1 दिलेलं आहे. सोबत यात खास गेमिंगसाठी 'अल्ट्रा गेमिंग मोड'ही येतो.
Realme Narzo 10
किंमत - ११,९९९ रूपये (4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट)
डिस्प्ले - ६.५ इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले Corning Gorilla Glass 3 च्या प्रोटेक्शनसहित. खरंतर या किंमतीत Full HD+ डिस्प्ले हवा होता.
प्रोसेसर - खास गेमिंगसाठी MediaTek Helio G80 AI Octa Coar Processor
रिअर कॅमेरा - 48+8+2+2 मेगापिक्सेल क्वाड कॅमेरा (वाईड ॲन्गल, नाईट स्केप, पोट्रेट, मॅक्रो लेन्स सोबत)
फ्रंट-सेल्फी कॅमेरा - 16 मेगापिक्सेल AI सेल्फी कॅमेरा
बॅटरी - 5000 mAh (18 वॅट क्विक चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10 वर आधारीत Realme UI
Redmi Note 9 Pro
किंमत - १३,९९९ रूपये (4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट)
डिस्प्ले - ६.६ इंचाचा Full HD+ IPS LCD डिस्प्ले Corning Gorilla Glass 5 च्या प्रोटेक्शनसहित
प्रोसेसर - नवीन Qualcomm Snapdragon 720G Octa Coar Processor
रिअर कॅमेरा - 48+8+5+2 मेगापिक्सेल क्वाड कॅमेरा (अल्ट्रा नाईट स्केप, स्लो मोशन, वाईड ॲन्गल, मॅक्रो लेन्स, 10X डिजीटल झूम, पोट्रेट मोड, प्रो मोड)
फ्रंट-सेल्फी कॅमेरा - 16 मेगापिक्सेल AI सेल्फी कॅमेरा
बॅटरी - 5020 mAh (18 वॅट फास्ट चार्जरसोबत)
ऑपरेटिंग सिस्टिम - Android 10 वर आधारीत MIUI 11
पाण्यापासून वाचवण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये P2i नॅनो कोटिंग दिले गेले आहे. त्याचबरोबर यामध्ये वेगवान LPDDR4X रॅम असून फिंगरप्रिंट सेन्सर हा पॉवर बटनवरती दिलेला आहे.
Realme 6
किंमत - १३,९९९ रूपये (4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरीएंट)
डिस्प्ले - ६.५ इंचाचा Full HD+ IPS LCD डिस्प्ले (90Hz Ultra Smooth रिफ्रेश रेट आणि Corning Gorilla Glass 3 प्रोटेक्शन)
प्रोसेसर - गेमिंगसाठी शक्तीशाली MediaTek Helio G90T Octa Coar Processor
रिअर कॅमेरा - 64+8+2+2 मेगापिक्सेल AI क्वाड कॅमेरा Samsung GW1 सेन्सरसोबत (अल्ट्रा वाईड ॲन्गल, मॅक्रो लेन्स, पोट्रेट लेन्स)
फ्रंट-सेल्फी कॅमेरा - 16 मेगापिक्सेल इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा
बॅटरी - 4300 mAh. 30 वॅटचा फ्लॅश चार्जर सोबत मिळतो आणि तो फक्त ५५ मिनिटांत पुर्ण बॅटरी चार्ज करतो.
ऑपरेटिंग सिस्टिम - Android 10 वर आधारीत Realme UI
या स्मार्टफोनमध्येही फिंगरप्रिंट सेन्सर हा पॉवर बटनावरतीच दिलेला आहे.
Samsung M30s
किंमत - १४,९९९ रूपये (4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरीएंट)
डिस्प्ले - ६.४ इंचाचा Full HD+ sAMOLED डिस्प्ले (या किंमतीतही AMOLED डिस्प्ले असणारा हा एकमेव स्मार्टफोन आहे.)
प्रोसेसर - Samsung Exynos 9611 Octa Coar Processor, Game Booster Technology सहित
रिअर कॅमेरा - 48+8+5 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा (नाईट मोड, अल्ट्रा वाईड ॲन्गल, डेप्थ लेन्स, स्लो मोशन, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग)
फ्रंट-सेल्फी कॅमेरा - 16 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा
बॅटरी - 6000 mAh (15 वॅट फास्ट चार्जरसोबत)
ऑपरेटिंग सिस्टिम - Android 10 वर आधारीत One UI
वरिल सर्व स्मार्टफोन्स हे अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि त्या त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन मागवू शकता.