computer

बीएमडब्ल्यू बाईक, ऍपल आयपॅड प्रो, सॅमसंग गॅलक्सी वॉच...ही भारतीय कंपनी नव्या कर्मचाऱ्यांना काय काय देत आहे?

आपल्या कर्मचाऱ्यांना कामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अनेक कंपन्या आकर्षक ऑफर्स त्यांना देत असतात. वेळोवेळी अशा ऑफर्स बातम्या आणि चर्चांचा विषयसुद्धा बनतात. सध्या देशात चर्चा आहे ती भारतपेकडून देण्यात आलेल्या बीएमडब्ल्यू गाड्यांच्या ऑफर्सची.

भारतपे ही भारताची पॉईंट ऑफ सेल्समधील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. या भारतपे मध्ये जॉईन होऊ पाहणाऱ्या नव्या कर्मचाऱ्यांना कंपनीने आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत. यात बीएमडब्ल्यू बाईक, ऍपल आयपॅड प्रो, सॅमसंग गॅलक्सी वॉच, एवढेच नाहीतर दुबई येथे आयसीसी T20 वर्ल्डकप टूरचा सुद्धा यात समावेश हे.

भारतपे सध्या आपल्या विस्तार योजनेवर काम करत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये मर्चंट आणि कंज्युमर लँडिंग क्षेत्रात काही उत्पादने आणण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी त्यांना नव्या लोकांची गरज आहे. आपल्या मुख्य (कोअर)टीममध्ये १०० नवे कार्यक्षम कर्मचारी त्यांना सहभागी करून घ्यायचे असल्याने अशा भरभक्कम ऑफर दिल्या गेल्या आहेत.

भारतपेच्या नव्या टीमला बाईक पॅकेज आणि गॅझेट पॅकेज यापैकी कुठलेही एक निवडता येणार आहे. बाईक पॅकेजमध्ये ५ सुपरबाईक्सचे पर्याय आहेत. यात बीएमडब्ल्यू G310R, जावा पेराक, केटीएम ड्युक ३९०, केटीएम आरसी ३९०, रॉयल एनफिल्ड हिमालयन या गाड्यांचा समावेश आहे.

हे झालं बाईक पॅकेजबद्दल. गॅझेट पॅकमध्ये ऍपल आयपॅड प्रो, बोस हेडफोन, हर्मन कारडन स्पीकर, सॅमसंग गॅलक्सी वॉच, wfh डेस्क अँड चेयर आणि फायरफॉक्स टायफून 27.5 डी बायसिकल अशा गोष्टी आहेत. याचबरोबर भारतपेची ही नविन टीम दुबई येथे होऊ घातलेल्या T20 वर्ल्डकपचे सामने मैदानावर बसून पाहू शकणार आहे.

विशेष गोष्ट म्हणजे भारतपेने ही योजना ८ महिने आधीच लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या दमाचे टेक एक्सपर्ट आपल्याकडे खेचण्यासाठी भारतपेने ही आकर्षक ऑफर दिलेली आहे. भारतपे गेल्या काही दिवसांत प्रगतीच्या वाटेवर असल्याने विविध पध्दतीने ते आपले पाय पसरत आहेत. सध्याची ही ऑफर देखील त्याचाच एक भाग म्हणता येईल.

सबस्क्राईब करा

* indicates required