computer

या माणसावर कावळे हल्ला का करतायत ? कारण अगदीच फिल्मी आहे !!

मंडळी, नागीण, तेरी मेहेरबानियां किंवा तसले सिनेमे पाह्यले असतीलच ना तुम्ही?? त्यात काहीही करून साप, कुत्रा किंवा जो काही असेल तो प्राणी माणसांवर बदला घेतो असे तुम्ही बघितले असेलच.  या सगळ्या सिनेमाच्या स्टोऱ्या.  पण आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एखादा पक्षी माणसाच्या मागे लागला आहे, असे उदाहरण खऱ्या आयुष्यात तुम्ही कधी बघितले नसेल, तर आता ते ही पूर्ण होणार आहे.

हा किस्सा भोपाळमधला आहे. तिथे काही कावळे शिव केवट नावाच्या एका माणसाला घरातून बाहेरच निघू देत नाहीत. तो बाहेर निघाला की सगळे त्याला त्रास देतात. आणि हे तब्बल ३ वर्षांपासून सुरू आहे राव!! असं म्हणतात की त्या माणसाने एकदा एका कावळ्याच्या पिल्याला एका जाळ्यात अडकवले. नंतर त्याला वाचविण्यासाठी या शिवने प्रयत्नसुद्धा केले, पण ते पिल्लू काही वाचलं नाही. बाकीच्या कावळ्यांना असे वाटले की शिवनेच आपल्या मित्राला मारले आहे.  तेव्हापासून सर्व कावळे सूड उगविण्यासाठी त्याच्या मागे लागले आहेत. 

तिथल्या गावकऱ्यांनी सांगितले की शिव घराबाहेर निघाल्यावर त्यांच्यावर ते कावळे एखाद्या फायटर प्लेन्सप्रमाणे हल्ला करतात. जणूकाही शिव त्यांच्या तावडीत सापडला तर ते त्याचा खूनच करतील. कावळे रोज शिवच्या मागावर असतात आणि जिथे तो दिसेल तिथे त्याच्यावर चोच मारतात.  त्याच्या डोक्यावर कावळ्याच्या चोचीचा व्रणही आहे. सद्या या कारणामुळे शिव कावळ्यांना हाकलण्यासाठी नेहमी सोबत काठी वापरतो. 

मंडळी वाशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या रीसर्चर्सनी शोध लावला आहे की कावळ्यांमध्ये इतर पक्षांपेक्षा बदला घेण्याची भावना जास्त असते. एका छोट्याशा चुकीमुळे मात्र त्या शिवचे जगणे मुश्किल झाले आहे.

 

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required