मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

५० मिनिटांत तीन पराठे खाऊन दाखवा आणि आयुष्यभरासाठी फुकट अन्न आणि १ लाखाचा विमा मिळवा!!

1 मिनिट वाचन
शेअर करा:
५० मिनिटांत तीन पराठे खाऊन दाखवा आणि आयुष्यभरासाठी फुकट अन्न आणि १ लाखाचा विमा मिळवा!!

ही जाहिरात आहे  हरियाणातल्या रोहतकमधल्या तपस्या पराठाची.

बरेचजण ही पैज जिंकायला म्हणून आले आणि हात हलवत परत निघून गेले. आजवर फक्त दोनच लोकांना हे साध्य करता आलंय. एकाने ४० मिनिटांत ३ पराठे खाल्ले तर दुसर्‍याने ५० मिनिटांत ४!! इतके पराठे सहजपणे खाता न येण्याचं कारण आहे त्यांचा आकार. या पराठा हाऊसचा एक-एक पराठा आहे दीड ते दोन फूट व्यासाचा आणि कमीत कमी एक किलो वजनाचा! त्यामुळं इथला एक पराठा हा चार पराठ्यांइतका भारी असतो.

इथल्या पराठ्यांची ख्याती इतकी पसरलीय की हे दीड-दोन फूट व्यासाचे पराठे रोज किमान दीडशे तरी विकले जातातच. असा छान तुपाने माखलेला खरपूस सोनेरी रंगावर भाजलेला गरामागरम पराठा खाण्यात मजा आहे. पाहा, जर हिंमत असेल तर ५० मिनिटांत तीन पराठे खा आणि मग आयुष्यभर पोटाची चिंताच नाही!!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!
लाइफस्टाइल

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

१४ ऑक्टोबर, २०२६

हुंडा सगळ्यांना नको होता... तरीही मुली मरत राहिल्या
लाइफस्टाइल

हुंडा सगळ्यांना नको होता... तरीही मुली मरत राहिल्या

१९६१ चा हुंडाबंदी कायदा आणि १९८५ ची सुधारणा असूनही हुंडाबळी का थांबत नाहीत? समाजाच्या मानसिकतेवर बोट ठेवणारा लेख.

२ ऑक्टोबर, २०२६