चिनी तरूणीचा २० प्रियकरांना चुना : आयफोन्स विकून घेतलं घर !!
या जगात भल्याभल्यांना गंडवणारे महाठक काही कमी नाहीत आणि त्यांच्या जाळ्यात अलगद जाऊन पहूडणारे दानशूरही कमी नाहीत. याचीच प्रचिती चीनमधल्या या विचित्र घटनेवरून येतेय..
चीनच्या शेनझेन शहरातल्या शीओ ली(नांव बदललं आहे) नावाच्या या तरूणीनं एकाचवेळी चक्क २० तरूणांसोबत प्रेमप्रकरण करून प्रत्येकाकडे आयफोन ७ची मागणी केली. आणि इतक्यावरच न थांबता मिळालेले हे सगळे २० आयफोन्स विकून तिने घरही खरेदी केलं! अॉफीस क्लर्क म्हणून काम करणाऱ्या या तरुणीच्या एका कलीगनेच ही गोष्ट आपल्या पोस्टद्वारे सोशल मिडियावर उघड केलीय.
या तरूणीनं एकाचवेळी २० तरूणांसोबत डेटिंग करून त्यांच्याकडे २० आयफोन्सची मागणी केली. हे सगळे आयफोन एका रिसेल प्लॅटफॉर्मवर विकून तिने तब्बल 12 लाख रूपये जमवले आणि या पैशातून तिनं आता आपल्या नव्या घराचे डाऊन पेमेंट केलंय. शीओचे आईवडील फारसे श्रीमंत नाहीत. पण त्यांना स्वतःचं घर हवं होतं. असंही या कलीगने या पोस्ट मध्ये सांगितलंय. तिच्या या कारनाम्याने सगळे चांगलेच अवाक झालेत. आता ति०ला नोकरीवरूनही काढण्यात आल्याच्या बातम्या आहेत.
बर्याच लोकांनी शीओच्या मॅनेजमेंट फंड्याचं कौतुक केलंय. तर काहीजणांना हा प्रश्न पडलाय की दिवसाच्या २४ तासांत २० प्रियकरांना तिनं कसा काय वेळ दिला असेल? काही मुलींना तर "आम्हांला एक बॉयफ्रेंड मिळायची मारामार हिला एकाच वेळी २० कसे काय मिळाले?" हा प्रश्न पडलाय. आयफोन ७ लॉंच होऊन काही महिनेच झाले आहेत. इतक्या कमी वेळात तिनं हे २० आयफोन्स कसे जमवले हे मात्र कौतुक करण्यासारखं आहे.
हे सर्व काहीही असो.. पण दुनिया बेवकूफ है, बनानेवाला चाहीए.. हे मात्र खरं !!




