हवेतल्या हवेत पक्षी शिकारीची देवाणघेवाण कशी करतात माहित आहे? पाहा या फोटोंमध्ये !!

वन्यजीव छायाचित्रकार... यांच्या कॅमेऱ्यातून टिपलेली विविध छायाचित्रं आपल्याला कधीही न पाहिलेलं अनोखं वन्यजीवन न्याहाळण्याची संधी देतात. कधी कधी ते आपल्या कौशल्यानं कॅमेऱ्यात असे क्षण कैद करतात जे आपल्याला आश्चर्यचकित व्हायला भाग पाडतात.
हे फोटो पाहा. हवेत उंचावर अत्यंत वेगानं उडणारे दोन शिकारी पक्षी, त्यातला एक पक्षी आपल्या पायात पकडलेली शिकार खाली सोडतो, तर दुसरा हवेतच ती अलगद पकडतो.
— Patrick Coughlin (@myrgard) May 16, 2020
या फोटोंमध्ये दिसणाऱ्या या दोन पक्षांचं नाव नॉदर्न हॅरियर आहे. यातला एक पक्षी नर आहे तर दुसरी मादी आहे.
पहिल्या फोटोत वरती असणाऱ्या पक्ष्याने आपल्या पायात पकडलेली शिकार खाली सोडलेली दिसते.
दुसऱ्या फोटोत खालचा पक्षी हवेतल्या त्या भक्ष्याच्या दिशेने झेपावताना दिसतोय.
तिसऱ्या फोटोत खालच्या पक्षाने ते भक्ष्य हवेतच झेललेलं दिसतं.
हे अद्भुत क्षण चपळाईने टिपलेत वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पॅट्रिक कॉफलिन यांनी. ट्विटरवरती अनेकांनी हे फोटो रिट्विट करत पॅट्रिक यांच्या कौशल्याचं कौतुक केलंय. एका व्यक्तीनं याला प्रकाराला "कॉन्टॅक्टलेस डिलीव्हरी" असं नाव दिलंय!
बोभाटाचा या फोटोग्राफरच्या संयम आणि एकाग्रतेला सलाम!