computer

३० वर्ष सिगरेट ओढणाऱ्या माणसाची फुफ्फुसं पाहून सिगरेट ओढण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल !!

सिगरेट ओढल्याने काय होतं हे आपल्या सर्वांना माहित आहे. सिनेमा सुरु होण्यापूर्वी दाखवला जाणारा तो व्हिडीओ तर तुम्हाला आठवत असेलच. सिगरेट ओढल्याने आपल्या फुफ्फुसात मोठ्याप्रमाणात कार्बन जमा होतो हे नेहमीच दाखवलं जातं. तुम्ही तो व्हिडीओ पाहिला असेल तर स्पंज पिळून काढलेला काळा रंग तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येईल.

मित्रांनो, व्हिडीओत दाखवलेला हा प्रकार खऱ्या आयुष्यात त्याहून भयानक आणि किळसवाणा आहे. सध्या  चीनचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये डॉक्टर ५२ वर्षांच्या एका माणसाचं फुफ्फुस बाहेर काढताना दिसत आहेत. या माणसाने गेली ३० वर्ष रोज सिगरेटची पाकिटं फुंकली होती. त्याचा परिणाम म्हणून त्याच्या फुफ्फुसांच काय झालं हे तुम्हीच या व्हिडीओमध्ये पाहा.

मंडळी, हा माणूस नुकताच मेला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत होता फुफ्फुसांचा आजार. हा आजार किती गंभीर होता हे तुम्ही बघतच आहात. त्याच्या मृत्युनंतर डॉक्टरांनी त्याचं फुफ्फुस बाहेर काढलं. त्यावेळी हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला.

Dr. Chen यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओला त्यांनी ‘जियेन’ नाव दिलंय. ज्याचा अर्थ होतो ‘धुम्रपान सोडा’. पुढे त्यांनी लिहिलंय की “या फुफ्फुसांना पाहा, तुमच्यात अजूनही सिगरेट ओढण्याची हिम्मत आहे?”

गम्मत म्हणजे मरण्यापूर्वी या माणसाने आपले अवयव दान केले होते, पण जेव्हा अवयव तपासण्यात आले तेव्हा त्यांचा कोणताही उपयोग नसल्याचं दिसून आलं....पण त्यांचा वापर प्रबोधनासाठी नक्कीच  झाला आहे. हा व्हिडीओ जवळजवळ २५ कोटी वेळा बघण्यात आलाय. लोकांनी याला सर्वोत्तम धुम्रपान विरोधी व्हिडीओ म्हटलंय.

तुम्हाला काय वाटतं या व्हिडीओबद्दल ? सिगरेटच्या आहारी गेलेल्या मित्रासोबत ही पोस्ट नक्की शेअर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required