बॉलीवूडमध्ये गाजण्यापुर्वी हे १२ सिनेकलाकार जाहिरातीत झळकले होते !!

बॉलीवूड मध्ये नशीब अजमावण्याचे स्वप्न अनेक जण पाहतात पण, प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. शिवाय प्रत्येकालाच थेट चित्रपटांमध्ये संधी मिळत नाही आपल्यातील अभिनय कौशल्याची चुणूक दाखवण्यासाठी या कलाकारांना कधीकधी इतर मार्गांचाही अवलंब करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशाच काही मोजक्या कलाकारांविषयी ज्यांनी बॉलीवूड मध्ये येण्यापूर्वी आपल्या करिअरची सुरुवात जाहिरात आणि मॉडेलिंगद्वारे केली.
१) सलमान खान -
या यादीतले पहिले नाव आहे सलमान खान! आज संपूर्ण बॉलीवूडवर या नावाने आपला ठसा उमटवला असला तरी कधीकाळी सलमानही टीव्हीच्या जाहिरातीत झळकला होता. ही जाहिरात होती लिम्का या शीतपेयाची. त्याकाळी जर हा मुलगा भविष्यात संपूर्ण बॉलिवूडवर राज्य करेल अशी भविष्यवाणी कुणी केली असती तर त्यावर कोणाचाच विश्वास बसला नसता. सलमानची ही जाहिरात जर तुम्ही पाहिली तर तुम्हालाही बालपणीचे ते दिवस नक्कीच आठवतील.
२) बोमन इराणी -
तुमची स्वप्न साकार करण्यासाठी योग्य वेळ तीच असते जेव्हा तुम्ही ती साकारण्याचा निश्चय करता. बोमन इराणी यांच्याकडे पाहिल्यानंतर या वाक्याची प्रचिती निश्चितच येते. कारण त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात वयाच्या ४१ व्या वर्षी केली. ही सुरुवात करताना त्यांनाही जाहिरातीचाच आधार मिळाला. तुम्हाला पार्ले-जीच्या क्रॅकजॅक बिस्किटाची जाहिरात आठवत असेल, ज्यात हिराणी यांनी मिस्टर जॅक बनून आपली छाप पडली होती. त्यानंतर २००३ मध्ये आलेल्या मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातील डीन डॉ. अस्थानाच्या भूमिकेने त्यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली.
३) अनुष्का शर्मा -
अनुष्का शर्माने २००८ साली ‘रबने बनादी जोडी’ चित्रपटातून चित्रपट विश्वात पाऊल ठेवले, परंतु यापूर्वी अनुष्का टीव्हीवरील अनेक जाहिरातीतून दिसली होती. तिची सेबोलीन साबणाची जाहिरात खूपच गाजली होती. ‘रबने बनादी जोडी’ च्या आधी लगे रहो मुन्नाभाई सिनेमातल्या एका दृश्यात पोस्टरवर तिचा चेहरा दिसला होता. पण या चित्रपटात काम करण्याची संधी मात्र तिला मिळाली नाही.
४) सिद्धार्थ मल्होत्रा -
चित्रपट सृष्टीतून आपले करियर करण्यापूर्वी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मॉडेलिंग करण्यात व्यस्त होता. चार वर्षे त्याने मॉडेलिंग क्षेत्रात घालवली होती. शिवाय चित्रपटामध्ये त्याची स्वतंत्र ओळख निर्माण होण्याआधी त्याने Pond’s च्या जाहिरातीत काम केले होते. शिवाय माय नेम इज खान या करण जोहर दिग्दर्शित चित्रपटासाठी त्याने सह दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते.
आणि हो पॉंड्स पावडर च्या जाहिरातीत सिद्धांत बरोबर दिसणारी ती मुलगी कोण हे तुम्ही ओळखले का हो बरोबर ती आहे आपली जन्नत गर्ल सोनल चौहान.
४) सिद्धार्थ मल्होत्रा -
चित्रपट सृष्टीतून आपले करियर करण्यापूर्वी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मॉडेलिंग करण्यात व्यस्त होता चित्रपटात येण्यापूर्वी ची चार वर्षे त्याने मॉडेलिंग क्षेत्रात घालवली होती शिवाय चित्रपटामध्ये त्याची स्वतंत्र ओळख निर्माण होण्याआधी त्याने दौंडच्या जाहिरातीत काम केले होते शिवाय माय नेम इज खान या करण जोहर दिग्दर्शित चित्रपटासाठी त्याने सह दिग्दर्शक म्हणून ही काम केले होते आणि पॉंड्स पावडर च्या जाहिरातीत सिद्धांत बरोबर दिसणारी ती मुलगी कोण हे तुम्ही ओळखले का हो बरोबर ती आहे आपली जन्नत गर्ल सोनल चौहान.
५) प्रिती झिंटा-
बॉलिवूड आणि त्यानंतर क्रिकेट मध्ये आपले नशीब आजमावले ल्या प्रीति जिंटा ने क्रिमिनल सायकोलॉजी आणि इंग्लिशची पदवी मिळवली होती. त्यानंतर तिने मॉडेलिंग मधून आपल्या करिअरला सुरुवात केली. तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात चॉकलेटच्या जाहिरातीद्वारे झाली होती. पुढे तिने लिरील साबणाच्या जाहिरातीतही काम केले 1998 सली आलेल्या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
६) शाहिद कपूर -
शाहिद कपूर देखील सुरुवातीला हिरोच्या मागे बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करत होता. शिवाय कॉमप्लॅन च्या जाहिरातीत बालकलाकार म्हणूनही झळकला होता. ऐश्वर्या रॉयच्या ‘ताल’ मधील काही आग लगे लग जावे या गाण्यात त्याने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले होते. पण इश्क विश्क पासून ते कबीर पर्यंत आपल्या प्रत्येक चित्रपटात त्याने दमदार भूमिका वठवल्या आहे.
७) आयेशा टाकिया -
शाहिद कपूर आणि आशा टाकिया दोघेही कॉम्प्लॅन च्या जाहिरातीत एकत्र दिसले होते. आयेशाने ‘आय एम अ कॉम्प्लॅन गर्ल’ असे म्हणत पंधराव्या वर्षी जाहिरातीतून आपल्या करिअरची सुरुवात केली त्यानंतर तिने अनेक म्युझिकल अल्बम्स मधून हे काम केले. शेवटी २००४ सली आलेल्या ‘टारझन- द वंडर कार’ या चित्रपटाने तिला बॉलीवूड मध्ये पदार्पणाची संधी दिली.
८) दिपीका पदुकोण-
दीपिका पदुकोण अभिनय कारकिर्दीची सुरुवात देखील जाहिरातीत मधूनच झाली होती. दीपिका आठ वर्षांची असताना बाल कलाकार म्हणून जाहिरातीत आली. टिव्ही वर येणारी क्लोजअप टूथपेस्टची जाहिरात आणि त्यात निरागसपणे खिदळणारी दीपिका तुम्हालाही आठवत असेल. त्यानंतर लिरील साबणाच्या जाहिरातीने मात्र सगळ्यांचेच लक्ष तिच्याकडे वेधले.
९) राजकुमार हिरानी -
मुन्नाभाई एमबीबीएस, थ्री इडीयट्स, पीके आणि संजू सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक आणि बॉलिवूडमधील आघाडीचे निर्माते राजकुमार हिराणी यांनी देखील कधीकाळी जाहिरातीमध्ये काम केले होते. फेविकॉलच्या ‘जोर लगा के हईशा’ या जाहिरातीत राजकुमार हिरानी यांना पाहिल्याचे तुम्हाला आठवत असेल. त्यांनी अनेक जाहिरातींचे दिग्दर्शन केले. परंतु चित्रपट निर्मिती हेच त्यांचे मुख्य स्वप्न होते. जाहिरातींचे दिग्दर्शन थांबवल्यानंतर त्यांनी विधु विनोद चोप्रा सोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरू केले. मुन्नाभाई एमबीबीएस हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट. त्यांच्या या पहिल्यावहिल्या चित्रपटाने त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचले.
१०) वरूण धवन-
वरूणने लहान वयापासूनच मॉडेलिंगला सुरुवात केली. बोर्नव्हिटाची त्याची जाहिरात अनेकांच्या स्मरणात राहिली. अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी त्याने करण जोहर सोबत सहदिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. २०१२मध्ये आलेल्या ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटात त्याला पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतरही वरूणने अनेक चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवली.
१०) विद्या बालन-
मुन्नाभाई मध्ये गुड मॉर्निंग इंडिया असे म्हणत सगळ्या इंडियाची मॉर्निंग एकदम चांगली करणारी आरजे जान्हवी आठवत असेलच. हो हो आम्ही विद्या बालन बद्दलच बोलतोय. चित्रपटातील अभिनयाची कारकीर्द सुरू करण्यापूर्वी विद्या सर्फ डिटर्जंट पावडरच्या जाहिरातीत दिसली होती. त्यानंतर ९०च्या दशकात छोट्या पडद्यावरील गाजलेली विनोदीमालिका ‘हम पांच’ तुम्हाला आठवत असेलच यामध्येही तिने चाश्मिष राधिकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिला एका बंगाली चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली होती. या चित्रपटानंतर दोन वर्षांनी ‘परिणीता’च्या माध्यमातून तिने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिची भूमिका खूपच गाजली होती प्रेक्षक आणि समीक्षकांनी देखील तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.
१२) जेनेलिया डिसूजा-
अमिताभ बच्चनची पारकर पेनची जाहिरात तुम्हाला आठवत असेल. या जाहिरातीत अमिताभ सोबत दिसलेली ती मुलगी कोण हो ती हे तुम्ही ओळखले का? बरोबर तीच होती जेनेलिया डिसूझा. २००३मध्ये आलेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटातून तिने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या शूटिंग वेळीच ती आपल्या पदवी परीक्षेचीही तयारी करत होती.
१२) विवेक ओबेरॉय-
विवेक ओबेरॉय याने राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याची भूमिका खूपच हटके होती. त्याच्या या भूमिकेसाठी समीक्षक आणि प्रेक्षकांनीही त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली. कंपनी करण्यापूर्वी विवेक ओबेरॉय न्यूयॉर्क लोट्टोच्याच्या जाहिरातीत दिसला होता. भारतात ही जाहिरात खूपच वादग्रस्त ठरली त्यामुळे भारतात या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी