computer

हा २४ वर्षांचा मुलगा एका रात्रीत श्रीमंत कसा झाला ? त्याची संपत्ती तर ट्रम्पपेक्षा जास्त आहे !!

अब्जावधी रुपये जमवायला काहींचा जन्म जातो, पण एक मुलग आहे ज्याला काहीही कष्ट न करता तब्बल ३.८ बिलियन डॉलर मिळालेत. ३.८ बिलियन म्हणजे तब्बल २६९ अब्ज रुपये !!!

मंडळी, या पोराचं नाव आहे एरिक त्से. त्याचे आईवडील एका चीनी औषध कंपनीचे मालक आहेत. त्यांनी नुकतंच आपल्या मुलाला ३.८ बिलियन डॉलर्स एवढ्या किमतीचे कंपनीचे शेअर्स दिले आहेत. एवढे पैसे मिळाल्यानंतर हा गडी एका रात्रीतच ट्रम्प पेक्षा जास्त श्रीमंत झाला आहे. फोर्ब्सच्या माहितीनुसार ट्रम्प तात्यांची मालमत्ता ३.१ बिलियन डॉलर्स एवढी आहे.

तर, एरिक त्सेची गोष्ट इथेच संपत नाही. त्याला मिळालेले शेअर्स म्हणजे बड्डे गिफ्ट नव्हे. त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर कंपनीच्या कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी टाकली आहे. त्यासाठीच त्यांनी मुलाच्या नावावर शेअर्स केले आहेत.

याचा अर्थ पैशांच्या बदल्यात तेवढीच मोठी जबाबदारी आलेली आहे. शेवटी पैसे हवे असतील तर मेहनत ही लागतेच हेच खरं.

सबस्क्राईब करा

* indicates required