Books By kilo!! मग वाट कसली बघताय लेको ?... ”टूट पडोsssss !!!”

मंडळी, पुस्तकांच्या चाहत्यांसाठी आम्ही एक मोठ्ठी खुशखबर घेऊन आलोय. समजा जर हजारो पुस्तकं एकाच जागी मिळत असतील आणि तेही चक्क किलोच्या भावात तर? भौ, पुस्तक प्रेमींसाठी तर तो स्वर्गच ठरेल ना. मंडळी, हा पुस्तकांचा स्वर्ग मुंबई आणि ठाण्यात प्रत्यक्षात अवतरला आहे. पत्ता काय आहे? काही अटी वगैरे आहेत का? असले प्रश्न आले असतील तर खाली वाचा की राव...

Books By kilo
BooksBykilo  हा उपक्रम ठाण्यातल्या ‘पोलीस परेड ग्राउंड’ येथे ८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. हा उपक्रम प्रामुख्याने इंग्रजी पुस्तकांसाठी आहे. पण म्हणजे इथे फक्त इंग्रजी पुस्तकं आहेत असं नाही बरं का. सध्याच्या घडीला प्रसिद्ध असलेली सर्व मराठी पुस्तके इथे तुम्हाला १०% डिस्काउंटवर मिळतील. त्याच बरोबर काही हिंदी पुस्तकं देखील तुम्ही घेऊ शकता.
इंग्रजीतली सर्व प्रसिद्ध, बेस्टसेलर पुस्तकं तुम्ही खालील प्रमाणे घेऊ शकता :
(प्रती किलो)
रु. १५० – बेस्ट सेलर इंग्रजी कथा-कादंबऱ्या, चरित्रे, पाककला, भटकंती, फोटोग्राफी, आरोग्य आणि शैक्षणिक पुस्तके.
रु. २०० – बालसाहित्य
रु ३०० – प्रसिद्ध इंग्रजी कथा-कादंबऱ्या. (ही पुस्तके १५० रुपयाच्या यादीत नसतील)

Books By Weight 
असाच Books By Weight नावाचा उपक्रम सुंदरबाई हॉल, चर्चगेट येथे ८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबरपर्यंत सुरु आहे. पण इथे मराठी, हिंदीपैकी कोणतेही पुस्तक नाही. इंग्रजी कथा-कादंबऱ्यां ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी ही जागा बेस्ट आहे. इथे तुम्ही खालील प्रमाणे पुस्तके घेऊ शकता.
(प्रती किलो)
रु. १०० – बेस्ट सेलर कथा-कादंबऱ्या, चरित्रे, पाककला, भटकंती, फोटोग्राफी, आरोग्य आणि शैक्षणिक पुस्तके.
रु. २०० – बालसाहित्य
रु. ३०० – प्रसिद्ध लेखकांच्या बेस्ट सेलर कथा-कादंबऱ्या, ललित इत्यादी. (ही पुस्तके १०० रुपयाच्या यादीत नसतील)
चर्चगेटपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर सुंदरबाई हॉल आहे.

तर मंडळी,  मुंबई आणि ठाण्याच्या पुस्तकवेड्या पब्लिकसाठी हि एक मोठी मेजवानी आहे हे काही सांगायला नको. राव, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना पुस्तके भेट द्या, स्वतः वाचा, मुलांना छान छान गोष्टी ऐकवा, पाककला शिका, मेंदूला नवीन खाद्य द्या...आणि वगैरे वगैरे.... एकूण काय तर वाचक व्हा आणि वाचक वाढवा !!

मग वाट कसली बघताय लेको ?... ”टूट पडोsssss !!!”

सबस्क्राईब करा

* indicates required