नोकरी अश्शी हवी!फेसबुकपासून दूर ठेवण्यासाठी चक्क थप्पड मारायची पण नोकरी मिळू शकते ?

Subscribe to Bobhata

सोशल मीडियाच्या सवयीबद्दल, अहं व्यसनाबद्दल बरेचदा बोलले जाते. फेसबुकवर दिवसातला बराचसा वेळ घालवणारे बरेच जण आहेत. कुठल्याही गोष्टीचं व्यसन वाईटच! त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष किती वेळ फेसबुकवर घालवला आहे हे मोजणारी ॲप्सदेखील आहेत. ॲप्स अनइन्स्टॉल करणे हाही सोशल मिडियापासून दूर राहण्याचा एक मार्ग आहे. पण, नहुधा या सर्वांचा उपयोग झाला नाही म्हणून एका भावाने काय आयडियाची कल्पना लढवली आहे बघा, जे वाचून तुम्ही चाट पडाल. खुद्द एलन मस्क यांनी जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा ही पोस्ट व्हायरल झाली.

मनीष सेठी असे या व्यक्तीचे नाव आहे. तो भारतीय-अमेरिकन आहे. फेसबुकच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी याने हा आगळावेगळा म्हणा किंवा विचित्र म्हणा, असा मार्ग स्वीकारला आहे. फेसबुकचे व्यसन सोडवण्यासाठी मनीषने एका महिलेला चक्क कामावर ठेवले आहे. या बाईचं नाव कारा. काराला या कामाचे दर तासाला ८ डॉलर (सुमारे ६०० रुपये) मिळतात. आणि काम काय करायचं? जेव्हा मनीष फेसबुक उघडेल, तेव्हा त्याला थप्पड मारायची.

तर, हे मनीषराव एक प्रोग्रामर आहेत. मनीष ९ वर्षांपासून फेसबुकच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी थप्पड खाण्याचा प्रयोग करत आहे. त्याने २०१२ पासून काराला कामावर ठेवले आहे. मनीष सांगतो, काराला कामावर ठेवण्याच्या आधी त्याची सरासरी कार्य क्षमता सुमारे ४०% होती. पण नंतर त्याची कामाची कार्यक्षमता ९८% पर्यंत वाढली.

मनीष सेठीच्या २०१२ सालातील अनुभवाची बरीच चर्चा झाली. पण आता तब्बल ९ वर्षांनंतर एलन मस्कने पाठवलेल्या इमोजीने पुन्हा लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मनीषच्या फोटोवर एलन मस्क यांनी कमेंट केली. यानंतर मनीष सेठी यांनी मस्कला उत्तर देताना ट्विटरवर लिहिले - या फोटोत असणारा मुलगा मीच आहे. एलन मस्क यांनी मला दोन इमोजी दिले आहेत. त्यामुळे माझा रीच कदाचित जास्त होईल."

मनीषची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्याची भन्नाट आयडिया वाचून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. तुम्ही सोशल मीडियापासून स्वतःला रोखण्यासाठी काय आयडिया लढवता?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required