computer

चांगला मध कसा ओळखावा? या वाचा दोन सोप्या पद्धती..

मध शुद्ध आहे की नाही हा मध वापरणाराला नेहमीच पडणारा प्रश्न आहे. एखाद्याने स्वतःसमोर मधमाश्यांच्या पोळ्यातून मध काढून घेतलेला असेल तर  ठीक.  पण तसं नसेल आणि पॅकबंद मध घेतला असेल तर त्याची शुद्धता कशी ओळखायची हा मोठा प्रश्नच असतो.  अशा वेळी एक साधीशीच कसोटी आपल्याला खर्‍या आणि खोट्या मधातला फरक दाखवते.

कसोटी क्र. १

काचेच्या ग्लासामध्ये पाणी घ्यावं. या पाण्यात मधाचा थेंब सोडावा. पाण्यात सोडलेला मधाचा थेंब जर तसाच्या तसा ग्लासाच्या तळाशी जाऊन बसला तर तो खरा किंवा शुद्ध मध असल्याचं समजलं जातं. मधाचा थेंब जर त्या पाण्यात विरघळला तर तो मध शुद्ध नाही, त्यात साखरेचा पाक असल्याचं समजलं जातं.

कसोटी क्र. २

कसोटी क्र. २आपल्याकडील मध एखादी काडी किंवा चमच्यावर घेऊन तो गॅसच्या ज्योतीवर धरावा. आगीच्या संपर्कात आल्यावर जर मध तडतड आवाज करू लागला तर त्यात पाणी किंवा साखरेचा पाक आहे असे जाणावे. म्हणजेच तो मध अशुद्ध समजावा. मात्र ज्योतीमध्ये धरल्यावर मध कोणताही आवाज न करता सहज जळू लागल्यास तो शुद्ध मध असल्याचं समजलं जातं.

जुन्या ग्रंथांमधून या कसोट्या सांगितलेल्या आढळतात. आपल्याकडील मधाचं शुद्धाशुद्धत्व तपासायला यांचा विचार करण्यास हरकत नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required