एक स्वल्पविराम की किमत तुम क्या जानो रमेशबाबू... इथे तर याची किंमत १३ लाख डॉलर आहे !!!

कायदेशीर करार करताय? जरा जपून! कॉपी पेस्टच्या जमान्यात तर जास्तच जपून! कायदेशीर करारात प्रत्येक शब्दाला मान असतो आणि तो दिला नाही तर व्याकरणाची एक चूक किती महाग पडू शकते, याची प्रचिती नुकतीच एका अमेरिकन कंपनीला आली. ओकहर्स्ट डेअरी या अमेरीकन कंपनीने त्यांच्या ड्रायव्हर सोबत केलेल्या करारात एक कॉमा (,) म्हणजे स्वल्प विराम टाकायचा राहिला आणि कोर्टाने ड्रायव्हरांच्या बाजूने निर्णय दिला. हा आदेश होता- कंपनीने १३ लाख नुकसान भरपाई द्यावी.

त्याचं झालं असं की, ओकहर्स्ट डेअरीने ड्रायव्हरांच्या सोबत केलेल्या करारात असं  वाक्य  होतं की , The canning, processing, preserving, freezing, drying, marketing, storing, packing for shipment or distribution of या वाक्यात or  या अव्ययाने जोडलेल्या दोन शब्दात shipment या शब्दानंतर स्वल्पविराम असणे आवश्यक होते. पण तो न टाकल्याने ड्रायव्हरने एकाच वेळी अतिरीक्त  कामे केली असा अर्थ झाला. मग काय,अतिरिक्त कामाची भरपाई म्हणून कंपनीला १३ लाख डॉलरची भरपाई करण्याचा आदेश मिळाला.  हा स्वल्प विराम जो  'ऑक्सफर्ड कॉमा  ' या नावाने प्रसिध्द आहे, त्या कॉमाने आतापर्यंत अनेक वेळा घात केलाय. असे अनेक किस्से अमेरीकन कोर्टात घडत असतात त्याचा हा नुकताच घडलेला नमुना !

सबस्क्राईब करा

* indicates required