computer

जगात सर्वात जास्त CCTV कॅमेरे असलेलं शहर भारतात आहे!! कोणत्या देशात सर्वात जास्त CCTV कॅमेरे आहेत?

जगभरातील सर्वात जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असलेल्या शहरांचा एक रिपोर्ट comparitech या संस्थेने तयार केला आहे. जगभरात सर्वात जास्त सीसीटीव्हींखाली असलेल्या शहरांमध्ये चीनचा क्रमांक पहिला लागतो. चीनमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो हे यावरून स्पष्ट होते.

असे असले तरी भारताची राजधानी दिल्ली या यादीत टॉपवर आहे. दिल्लीने शांघाय, लंडन, सिंगापूर, न्यूयॉर्क, बीजिंग या शहरांना पण मागे टाकले आहे. दिल्लीत एका चौरस किलोमीटर एवढ्या अंतरात तब्बल १८२६.५८ एवढे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. जगभरातील अनेक प्रगत देशांना आणि तेथील शहरांना याबाबतीत दिल्लीने मागे टाकले आहे.

दिल्ली व्यतिरिक्त इतर शहरांत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे असे आहेत:

१) लंडन

एका चौरस किलोमीटरमागे ११३४.४८ कॅमेरे

२) चेन्नई

एका चौरस किलोमीटरमागे ६०९. ९२ कॅमेरे

३) शेंझेन, चीन

एका चौरस किलोमीटरमागे ५२०.०८ कॅमेरे

४) वुक्सी, चीन

एका चौरस किलोमीटरमागे ४७२.६६ कॅमेरे

५) किंगदाओ, चीन

एका चौरस किलोमीटरमागे ४१५.८० कॅमेरे

६) शांघाय, चीन

एका चौरस किलोमीटरमागे ४०८.४९ कॅमेरे

७) सिंगापूर, सिंगापूर

एका चौरस किलोमीटरमागे ३८७.५६ कॅमेरे

८) चँगशा, चीन

एका चौरस किलोमीटरमागे ३५३.८५ कॅमेरे

९) वुहान, चीन

एका चौरस किलोमीटरमागे ३३९.०१ कॅमेरे

सीसीटीव्हीबद्दल जगभर विविध मतप्रवाह आहेत. गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो तर यावरून लोकांच्या प्रायव्हसीच्या हक्कावर बंधने येतात असेहि लोकांचे म्हणणे असते. काही असो, आता हाही आपल्या जीवनाचा भाग आहेत. त्यामुळे ही माहिती तर आता आपल्याला असायलाच हवी, नाही का?

सबस्क्राईब करा

* indicates required