फक्त २७ लोकांचा देश - विश्वास बसत नाही ना ? मग पुढे वाचा !!
आपल्या इथे काहींना १०-१० मुलं असतात. त्यात काका-काकी, आजी-आजोबा हे तर वेगळेच. आपल्याकडं मोठ्या कुटुंबाची पद्धती आहे. साधारण ३०-४० माणसं एका परिवारात असू शकतात. तरी हे तरी अगदीच कमी, पण आम्ही आज एका अशा देशाबद्दल सांगणार आहोत जिथली लोकसंख्या बघून तुम्हाला धक्काच बसेल. या देशाची लोकसंख्या निव्वळ आणि नव्वळ ‘२७’ इतकी आहे. फक्त २७ लोक या देशात राहतात म्हणजे हा देश कसा? तर राव, हा देशच आहे. विश्वास बसत नसेल तर चला जाऊया या देशात.
तर मंडळी हा देश आहे इंग्लंड जवळच्या ‘सफॉल्क’ समुद्राच्या किनाऱ्यापासून १० किलोमीटर आत असलेला ‘सीलँड’ हा देश. सीलँड एका सागरी किल्ल्यावर वसवलेला देश आहे.
९ ऑक्टोबर २०१२ रोजी रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीने स्वतःला सीलँडचा प्रिन्स म्हणून घोषित केलं. त्यानं या देशाचे स्वंतंत्र चलन, झेंडा, पोस्टाचं तिकीट आणि पासपोर्टसुद्धा जाहिर केलाय.
तिथल्या नोटेवर रॉय बेट्सच्या पत्नीचा फोटो आहे. त्याच्या मृत्युनंतर मायकल हा रॉयचा मुलगा राजा झाला आहे आणि आता तो तिथे हुकुमत करत आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर या देशाला अजून मान्यता मिळालेली नाही. सीलँड देशातील लोकांकडे उपजीवेकेचं साधन नसल्याने ते बेरोजगार आहेत. इन्टरनेटवर सीलँडविषयी बातमी व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी देशाला डोनेशन दिलं. फेसबुकवर ‘Principality of Sealand’ या नावाने पेज देखील आहे. १,००,००० लोकांनी या पेजला लाईक केलं असून या देशाला बघायला आता पर्यटक जात आहेत.
या देशाला अजून मान्यता मिळाली नसल्याने अजूनही वॅटीकन सिटी हा देशाच जगातील सर्वात लहान देश आहे. तिथं २०१६च्या जनगणेनुसार ८४६ लोक राहात होते.




