सेफ्टी पिनचा संशोधक कोण ? वाचा पूर्ण माहिती!!

एक साधी सेफ्टी पिन, तिच्याकडे आपण कधी नीट बघतो का? गरजच नाही!

पण ही पिन सुद्धा बनवावी लागते. तिचा आकार, तिची बनावट या मागचं डोकं कोणाचं असेल राव? खरं तर सेफ्टी पिन ही केवढी  क्षुल्लक गोष्ट आहे, पण तिच्या शिवाय काही वेळा आपलं सगळं काम अडतं. बल्बचा शोध कोणी लावला? तर एडिसननं, गुरुत्वाकर्षणाचा? न्यूटनबाबानं...मग सेफ्टी पिनचा शोध देखील कोणी तरी लावलाच असलं ना भाऊ.

हाच मुद्दा घेऊन आलो आहोत आम्ही. चला तर जाणून घेऊया कोण आहे या सेफ्टी पिनच्या मागे.

स्रोत

भाऊ, सेफ्टी पिनच्या संशोधकाचं नाव आहे ‘वॉल्टर हंट’. सेफ्टी पिनचा शोध त्यानं १८४९ च्या दरम्यान लावला. या माणसाचं नाव आपल्याला माहित असण्याचं कारणच नाही. कारण यानं तयार केलेली कोणतीच गोष्ट आज त्याच्या नावावर नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या माणसाने १५ डॉलरचे कर्ज फेडण्यासाठी सेफ्टी पिनचं पेटंट अवघ्या ४०० डॉलर्सला विकलं होतं. ते विकत घेणाऱ्या कंपनीनं मात्र यातून करोडो कमावले.

वॉल्टर हंटनं आपल्या पूर्ण आयुष्यभरात शेकडो शोध लावले, पण पेटंट विकून आपली उपजीविका चालवावी लागत असल्यानं त्याचं नाव आज कुणालाही माहित नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required