computer

पाहा या जोडप्याने आवड आणि प्री-वेडिंग शूटचा कसा मस्त मेळ साधला..

सध्या लग्न हे ‘प्री-वेडिंग शूट’ शिवाय पूर्ण होऊच शकत नाही राव. कडक फोटोग्राफ्स आणि काहीवेळा (जास्त खर्च करून तयार केलेला) व्हिडीओ शूटसुद्धा!!  या व्हिडीओच्या बॅकग्राउंडमध्ये एखादं मस्त रोमँटिक सॉंग टाकलं की काय बहार येते. अहाहा... मस्त माहोल तयार होतो. आज आम्ही अशाच प्री-वेडिंग शूटबद्दल सांगणार आहोत. पण हा जरा हटके आहे बॉस....

टिपिकल बॉलीवूड स्टाईल प्री-वेडिंग शूटला फाटा देत विनित आणि विशाखा यांनी आपल्या खवय्येगिरीला प्री-वेडिंग शूटमध्ये सामील करून घेतलंय. मासे, तंदुरी चिकन, डोनट्स, नुडल्स, डोसा, इडली ते पान, चहा, कॉफी, आईस्क्रीम असं जे जे दोघांना आवडतं, त्याच्या बरोबरीने दोघांनी फोटोशूट केलंय. या सर्व फोटोंमध्ये त्याचं एकमेकांवरचं प्रेम तर दिसत आहेच, पण त्याचं खाण्यावर किती प्रेम आहे हे सुद्धा भरभरून दिसतंय.

विनीत आणि विशाखा यांच २१ जानेवारी रोजी गोव्याला लग्न होणार आहे. सध्याच्या ट्रेंडप्रमाणे त्यांनी सुद्धा प्री-वेडिंग शूटचा विचार केला. पण त्यांच्या खादाडीला ते विसरलेले नाहीत. त्यांची आवडती डिश, आवडतं हॉटेल, ते पहिल्यांदा जिथे भेटले ते रेस्तरां, मुच्छड पानवालाचा पान, गूस्टोसोचा पिज्जा, इत्यादी जागांची त्यांनी सफर केली आहे.

काहीही म्हणा राव दोघांची आयडिया हटके आहे हे मानलंच पाहिजे. आता आम्ही जास्त काही सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा हा प्री-वेडिंग शूट.