computer

एकेकाळी मैदान गाजवणारा भारताचा निवृत्त क्रिकेटर गावासाठी कोविड सेंटर सुरु करतोय!!

२००७चा वर्ल्डकप लक्षात राहील तो भारताचा दारुण पराभव झाला या कारणासाठी!! पराभूत होऊन परत आलेल्या टीम इंडियाला देशवासियांच्या संतापाला सामोरे जावे लागत होते. सचिन आणि गांगुलीच्या रेस्टॉरंट्सवर हल्ला झाला होता. धोनीच्या घरी दगडफेक झाली होती. त्यावेळी सचिनने मुनाफ पटेलला विचारले, "सगळ्यांच्या घरावर काही ना काही होत आहे. तुझ्या घरी सगळे सुरक्षित आहेत का?" तेव्हा मुनाफने दिलेले उत्तर होते, "माझ्या गावात 8 हजार लोक राहतात आणि ते सगळे माझे सुरक्षारक्षक आहेत!!"

आता त्याच गावात हा पठ्ठ्या कोविड सेंटर सुरू करत आहे. २००७ च्या दारुण पराभवाची कसर भारताने २०११ चा वर्ल्डकप जिंकून भरून काढली. या विजयात मुनाफ पटेलचा वाटा हा महत्वाचा होता. झहीर आणि युवराजनंतर सर्वाधिक विकेट या गड्याने घेतले होते.

अनेक क्रिकेटर्स निवृत्तीनंतरसुद्धा कार्यरत असतात. प्रशिक्षक, निवडसमिती किंवा स्वतःची क्रिकेट प्रशिक्षण संस्था कशा ना कशाच्या माध्यमातून ते ऍक्टिव्ह असतात. पण मुनाफ मात्र विस्मृतीत गेला होता. तो पुन्हा बातम्यांमध्ये आला ते थेट कोविड सेंटर उभे करून!!!

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Munafpatel (@munafpatel13) on

वास्तविक मुनाफ खूप गरीब परिस्थितीतून पुढे आला आहे. त्याचे वडील मजूर म्हणून काम करत असत. असे असूनही त्याचे गावाबद्दल प्रेम त्याला समाज कार्य करण्यासाठी प्रेरित करत राहते. म्हणूनच त्याने गुजरातेतल्या भडोच जिल्ह्यातल्या इखार या त्याच्या गावात येथे स्वतःच्या जमिनीवर स्वखर्चाने कोविड सेंटर उभे केले आहे.

या सेंटरमध्ये रुग्णांना सर्व सुविधा पुरविण्यात येतात. खाण्या-पिण्यासाहित सर्व अत्यावश्यक सुविधा तेथे उपलब्ध आहेत. स्वतः मुनाफ वेळोवेळी तिथे भेट देऊन वेळोवेळी माहिती घेत असतो. मुनाफने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या गोष्टीची माहिती दिली. त्यानंतर देशभरात त्याचे कौतुक होत आहे. त्याचे आधीचे सहकारी युवराज सिंग आणि गौतम गंभीर यांनीसुद्धा त्याचे कौतुक केले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required