भारतीय जवानाने घालून दिलं माणुसकीचं नवीन उदाहरण...वाचून तुम्ही त्याला सलाम कराल !!

आज आम्ही एका भारतीय जवानाची गोष्ट सांगणार आहोत ज्याने आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन एक अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या जवानाचं नाव आहे राजकमल. त्याने चक्क नक्षलवाद्याला रक्तदान केलं आहे. चला वाचूया या संपूर्ण घटनेबद्दल.

राजकमल हा CRPFच्या एका तुकडीचा जवान आहे. त्याच्या तुकडीत आणि नक्षलवाद्यांमध्ये झारखंड भागात चकमक उडाली होती. या चकमकीत एक नक्षलवादी गंभीर जखमी झाला. या नक्षलवाद्याला मरण्यासाठी सोडून न देता CRPFने त्याला हॉस्पिटल मध्ये नेलं.

 

 

हॉस्पिटल मध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला रक्ताची गरज असल्याचं सांगितलं. राजकमलने मागचापुढचा विचार न करता रक्तदान करण्यास तयारी दाखवली. तो रक्तदान करत असतानाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर राजकमलच्या कौतुकांनी सोशल मिडिया ओसंडून वाहत आहे.

मंडळी, राजकमल आणि CRPFच्या तुकडीने माणुसकीचं एक नवीन उदाहरण घालून दिलं आहे. ह्या घटनेने भारतीय जवानांची आणि भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.

भारतीय सैन्याच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं ? तुमचं मत नक्की द्या !!

 

सबस्क्राईब करा

* indicates required