computer

मुंबईमध्ये अशी होते नवीन वर्षाची घोषणा ? तुम्हाला माहित होतं का ?

नवीन वर्षाची सुरुवात करण्याच्या कशा वेगवेगळ्या पद्धती असतात हे आम्ही तुम्हला परवाच्या लेखात सांगितलं होतं. अशी एक अनोखी पद्धत मुंबईत देखील आहे. याबद्दल तुम्हाला नक्कीच माहित नसणार.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उभ्या असलेल्या ट्रेन्स नवीन वर्षाच्या सुरुवातीची घोषणा म्हणून एकाच वेळी हॉर्न वाजवतात. हे आजच घडत नाहीय. ही अनेक वर्षांपासून चालत आलेली पद्धत आहे. २०२० वर्षाच्या आगमनाच्यावेळी सुद्धा अशाच प्रकारे हॉर्न वाजवून नवीन वर्षाची घोषणा करण्यात आली आहे. त्यावेळचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आजवर मुंबईत राहणाऱ्या लोकांनासुद्धा रेल्वेची ही परंपरा माहित नव्हती. तुम्हाला याबद्दल माहित होतं का ?

 

आणखी वाचा :

वेगवेगळ्या ११ प्रकारचे हॉर्न वाजवते रेल्वे : त्यांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का ?

सबस्क्राईब करा

* indicates required