computer

भारतातल्या टॉप १० उद्योगपतींची दिवसाची कमाई बघून घ्या!

अतिश्रीमंत लोकांबद्दल जगभर एक कुतूहल पाहायला मिळत असते. त्यांचा प्रवास त्यांची बिजनेस स्ट्रॅटेजी ते अनेक गोष्टी चवीने चघळल्या जात असतात. लोकांची तासाची कमाई म्हणजे आपली इतक्या वर्षांची कमाई असाही काही लोक हिशोब करतात. बिल गेट्सबद्दल नेहमी बोलली जाणारी गोष्ट म्हणजे त्याला जर बाजूला १०० डॉलर पडलेले दिसले तर ते उचलायला त्याला जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात त्याचे १०० डॉलरपेक्षा अधिक कमाई झाली असेल. यात तथ्य किती आणि विनोद किती हे सोडूनच देऊ. पण खरेच भारतातील श्रीमंतांची यादी आणि त्यांची श्रीमंती दिवसेंदिवस वाढत आहे. आज आपण भारतातील हे श्रीमंत एका दिवसाला किती कमवतात हेच जाणून घेणार आहोत.

१) मुकेश अंबानी

अंबानी फक्त देशातल्याच नाही, तर जगातल्या श्रीमंतांना मोठी टक्कर देत आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही तब्बल ७ लाख १८ हजार कोटी रुपये एवढी आहे. तर २०२० पासून त्यांनी एका दिवसाला १६३ कोटी रुपये कमावले आहेत.

२) गौतम अदानी

गौतम अदानी गेल्या काही वर्षात सुसाट गतीने श्रीमंत होत आहेत. त्यांची श्रीमंती ही एकूण ५ लाख ५ हजार ९०० कोटी आहे. तर गेल्या वर्षभरात ते रोज १००२ कोटी रुपये कमवत आहेत.

३) शिव नाडर

एचसीएल टेक्नॉलॉजीजचे शिव नाडर यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रात भक्कम पाय रोवला आहे. त्यांची एकूण संपत्ती २ लाख ३६ हजार कोटी आहे. एका दिवसात ते २६० कोटी कमवत असतात.

४) एसपी हिंदुजा

एसपी हिंदुजा आणि फॅमिली ग्रुप ट्रक्सपासून ल्युब्रिकन्ट्सपर्यंत पसरलेला आहे. त्यांची एकूण संपत्ती ही २ लाख २० हजार कोटी रुपये एवढी आहे. एका दिवसात त्यांची कमाई २०९ कोटी आहे.

५) लक्ष्मी मित्तल

कधीकाळी देशात सर्वात श्रीमंत असलेले लक्ष्मी मित्तल यांची आजची संपत्ती ही १ लाख ७४ हजार कोटी रुपये एवढी आहे. २०२० पासून ३१२ कोटी एवढी एका दिवसाची त्यांची कमाई आहे.

६) सायरस पूनावाला

कोरोनाची लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला यांची एकूण संपत्ती ही १ लाख ६३ हजार रूपये एवढी आहे. तर गेल्या वर्षभरात ते दिवसाला १९० कोटी रुपये कमवत आहेत.

७) राधाकिशन दमानी

डीमार्टचे राधाकिशन दमानी यांनी मुंबईमध्ये नुकतेच हजार कोटींचे घर घेतले. त्यांची एकूण संपत्ती ही १ लाख ५४ हजार कोटी रुपये असून त्यांची दिवसाची कमाई १८४ कोटी आहे.

८) विनोद शांतीलाल अदानी

विनोद शांतीलाल अडानी यांनी पण मोठी झेप घेतली आहे. त्यांची एकूण संपत्ती १ लाख ३१ हजार ६०० कोटी झाली असून दिवसाला ते २४५ कोटी कमवत आहेत.

९) कुमार मंगलम बिर्ला

आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला हे १ लाख २२ हजार २०० कोटींच्या संपत्तीसहित देशातील आघाडीचे उद्योजक आहेत. गेल्या वर्षभरात त्यांची दिवसाची कमाई ही २४२ कोटी राहिली आहे.

१०) जय चौधरी

हिमाचल प्रदेशातील आयआयटीमध्ये शिक्षण घेऊन स्वतःची सायबर सिक्युरिटी फर्म सुरू केलेले चौधरी यांची एकूण संपत्ती ही १ लाख २१ हजार कोटींची आहे. २०२० पासून ते दिवसाला १५३ कोटी कमवत आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required