बिअर पिणारे लोक्स, हे वाचून बिअर पिणे सोडणार का?

"एक तर उन्हाळा सुरू झालाय, बिअर पिणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. या सुप्रीम कोर्टामुळे एक तर दारूचं दुकान शोधणं अवघड होतंय. आता तर आम्ही एकदा बारमध्ये गेलो की टॉवरवर टॉवर रिचवणार. हे असले छप्पन लेख वाचलेत आम्ही"

हे जर तुमच्या मनात चालू असेल तर ही पोट खास तुमच्यासाठीच आहे. तर मंडळी बातमी अशी आहे की डेन्मार्कमध्ये म्हणे एक रिसायकल प्रोजेक्ट चालू केला आहे. त्यात तुमच्या मुतारीपासून बिअर बनविण्यात येते. काय हे वाचूनही आश्चर्य वाटत नाहीए? मग पुढील डिटेल्स वाचा..

तर डेन्मार्कमध्ये एक मोठं म्युझीक फेस्टिव्हल आहे. तिथे स्पेशल टॉयलेट बसवले जाणार आहे आणि त्यातून जमा होणारी मुतारी एका मोठया टँकमध्ये साठवून ठेवणार आहेत. या साठवलेल्या द्रव्याचा वापर बार्लीला आंबवण्यासाठी केला जाईल. 

​​(स्त्रोत)

 

तर मंडळी तुमच्याच लघवीपासून बनविलेली बिअर प्यायची तुमची तयारी आहे का? नसेल तर डेन्मार्कला जाऊ नका आणि आपल्या भारतात हे कुणी करणार नाही अशी प्रार्थना करा...

सबस्क्राईब करा

* indicates required